India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!

India vs Australia, 4th Test : भारताच्या अखेरच्या चार विकेट्सनं जोडल्या १५० धावा

By स्वदेश घाणेकर | Published: January 17, 2021 12:31 PM2021-01-17T12:31:39+5:302021-01-17T12:33:36+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 4th Test: From 186 for 6 to 336 for 10, India have added 150 runs for the last 4 wickets | India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!

India vs Australia, 4th Test : बंदो में है दम!; वॉशिंग्टन-शार्दूल यांनी 'सुंदर' खेळी, टीम इंडियाच्या शेपटानं कांगारूंना झोडपले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशार्दूल ठाकूर- वॉशिंग्टन सुंदर यांची वैयक्तिक अर्धशतकासह १२३ धावांची भागीदारीटीम इंडियाचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले होते, पण...भारताच्या अखेरच्या चार विकेट्सनं जोडल्या १५० धावा

India vs Australia, 4th Test Day 3 : प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सहज लोटांगण घालणाऱ्या भारताच्या शेपटानं आज कांगारूंना चांगलेच झोडले. आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतले तेव्हा टीम इंडिया १८३ धावांनी पिछाडीवर होता. तळाच्या पाच खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर ( पदार्पणवीर), शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व टी नटराजन ( पदार्पणवीर) या नवख्या गोलंदांचा समावेश होता. त्यामुळे हे शेपूट गुंडाळून टीम इंडियाला सहज बॅकफूटवर पाठवू असा आत्मविश्वास ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात दिसला. पण, वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ऑसींचा आत्मविश्वास फाजील ठरवला.  वॉशिंग्टन सुंदर-शार्दूल ठाकूरनं मोडले अनेक विक्रम; ७४ वर्षांनंतर प्रथमच घडला पराक्रम


ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे ( ३७)  व चेतेश्वर पुजारा ( २५) यांना माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली.  मयांक ३८, तर रिषभ २३ धावांवर बाद झाले.  फलकावर १८६ धावा असताना रिषभ माघारी परतला. भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि ऑस्ट्रेलिया शेपूट झटपट गुंडाळेल असेच वाटत होते. शार्दूल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर यांचा मोठा पराक्रम; ११० वर्षानंतर 'सुंदर' विक्रम 


पण, सुंदर आणि ठाकूर यांनी अनपेक्षित कामगिरी केली. दोघांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची विक्रमी भागीदारी केली. या डावातील ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. या दोघांनी सुरेख फटके मारून टीम इंडियाच्या फलंदाजांना कसे खेळावे, हाच धडा शिकवला. या दोघांनी ब्रिस्बेनवर भारतासाठी सातव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही नावावर केला. या दोघांनी ५९ धावा करताच १९९१चा कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा विक्रम मोडला. कपिल देव - मनोद प्रभाकर यांनी ५८ धावांची भागीदारी केली होती. MS Dhoniनंतर टीम इंडियासाठी वॉशिंग्टन सुंदरनं केला विक्रम, शार्दूल ठाकूरसह सावरला डाव


तिसऱ्या कसोटीत आर अश्विन व हनुमा विहारी यांनी टीम इंडियाचा पराभव टाळला, तर आजच्या सामन्यात सुंदर-ठाकूरनं टीम इंडियाची लाज वाचवली. या दोघांनी ३६ षटकं खेळून काढली.  पॅट कमिन्सनंही ही भागीदारी तोडली. ११५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार मारून ६७ धावा करणारा शार्दूलला त्यानं बाद केलं. सुंदर १४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६२ धावांवर बाद झाला. शार्दूल व सुंदर हे खेळपट्टीवर होते, तोपर्यंत भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि या दोघांमुळे ही पिछाडी ४० धावांपर्यंत कमी झाली. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३३ धावांची आघाडी घेता आली. जोश हेझलवूडनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Web Title: India vs Australia, 4th Test: From 186 for 6 to 336 for 10, India have added 150 runs for the last 4 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.