India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला बाद करण्यासाठी स्टीव्ह स्मिथकडून चिटिंग; Video Viral झाल्यानंतर चाहत्यांचा संताप

India vs Australia, 3rd Test Day 5 : रिषभ गोलंदाजांना जुमानत नसल्याचे दिसताना स्टीव्ह स्मिथकडून ( Steven Smith) हा रडीचा डाव खेळला गेला. स्मिथची ही चिटिंग स्टम्प्सच्या कॅमेरात कैद झाली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 11, 2021 07:33 AM2021-01-11T07:33:48+5:302021-01-11T15:46:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test Day 5 : Steve Smith removes Rishabh Pant's guard marks on crease after drinks break, Video  | India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला बाद करण्यासाठी स्टीव्ह स्मिथकडून चिटिंग; Video Viral झाल्यानंतर चाहत्यांचा संताप

India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला बाद करण्यासाठी स्टीव्ह स्मिथकडून चिटिंग; Video Viral झाल्यानंतर चाहत्यांचा संताप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देटीम इंडियाला लगेचच बसला धक्का, अजिंक्य रहाणे ४ धावांवर माघारीरिषभ पंत व चेतेश्वर पुजारा यांची चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारीरिषभ पंतनं मोडला सय्यद किरमानी यांचा विक्रम

India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. टीम इंडियासाठी हा मोठा धक्काचा होता, पण फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) सामन्याचे चित्र बदललं. वेदना होत असतानाही तो मैदानावर उतरला आणि आक्रमक खेळावर भर देताना टीम इंडियाला पहिल्या सत्रात १०८ धावा करून दिल्या. रिषभनं अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाच्या चाहत्यांच्या आशा उंचावल्या. ऑस्ट्रेलियाकडून रडीचा डाव सुरू झाला. रिषभ गोलंदाजांना जुमानत नसल्याचे दिसताना स्टीव्ह स्मिथकडून ( Steven Smith) हा रडीचा डाव खेळला गेला. स्मिथची ही चिटिंग स्टम्प्सच्या कॅमेरात कैद झाली.

२ बाद ९८ धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात करताना टीम इंडियासमोर ३०९ धावा बनवा किंवा सामना अनिर्णीत राखण्यासाठी प्रयत्न करा, हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे अजिंक्य व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांचा सामना अनिर्णिीत राखण्यावर अधिक भर असेल, हे निश्चित होते. पण, नॅथन लियॉयननं धावसंख्येत चार धावांची भर घातल्यानंतर टीम इंडियाला धक्का दिला. अजिंक्य ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हनुमा विहारीला न पाठवता रिषभ पंतला बढती देण्यात आली. त्याचा फायदा संघाला पहिल्या सत्रात झाला. 


रिषभनं जोरदार फटकेबाजी केली. ऑसी कर्णधार टीम पेन यानं त्याला दोन जीवदान दिले. रिषभ हा टीम इंडियाच्या सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात शतक झळकावण्याचा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज आहे आणि आजही त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे. २००६ नंतर ऑस्ट्रेलियात एका सत्रात सर्वाधिक ७३ धावा करण्याचा विक्रम रिषभनं नावावर केला. यापूर्वी चेतेश्वर पुजारानं अॅडलेड कसोटीत ७७ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियात भारतीय यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक ४७१ धावांचा सय्यद किरमानी यांचा विक्रम रिषभनं मोडला. त्यानं १० डावांमध्ये ४८७ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी ३११ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

रिषभला बाद करण्यासाठी स्मिथनं चिटिंग केल्याचे समोर आले. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान स्मिथकडून रिषभचे गार्ड मार्क नष्ट करण्याचा प्रयत्न स्मिथ करताना दिसला. विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला.

रोहित शर्मानं ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शुबमन गिल ३१ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाले. पुजारानं २०५ चेंडूंत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. रिषभ पंतनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या. मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच आहे. हनुमा विहारी १६१ चेंडूंत २३, तर आर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला.  


पाहा व्हिडीओ...


Web Title: India vs Australia, 3rd Test Day 5 : Steve Smith removes Rishabh Pant's guard marks on crease after drinks break, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.