India vs Australia, 3rd Test Day 4 : Ravichandran Ashwin gets Steve Smith's wicket yet again in this series as he traps him lbw for 81   | India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, आर अश्विननं पुन्हा स्टीव्ह स्मिथला 'मामा' बनवलं

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, आर अश्विननं पुन्हा स्टीव्ह स्मिथला 'मामा' बनवलं

ठळक मुद्देऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात ३५ षटकांत ७९ धावा करताना २ विकेट गमावल्या.सिडनी क्रिकेट मैदानावर सलग पाच अर्धशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज भारताविरुद्ध दोन्ही डावांत ५०+ खेळी करण्याची स्मिथची ही तिसरी वेळ

India vs Australia, 3rd Test Day 4 : दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या टीम इंडियानं अजूनही हार मानलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचे पहिले सत्र तुल्यबळ राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात आर अश्विननं ( R Ashwin) टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. त्यानं स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) पुन्हा मामा बनवत तंबूत जाण्यास भाग पाडले. स्मिथच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियानं तीनशेपार आघाडी घेतली आहे आणि त्याच्या विकेटनं टीम इंडियाला मोठं यश मिळालं आहे. 

२ बाद १०३ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला असता. पण, स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या विहारीनं अगदी सोपा झेल टाकला. मार्नस लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) तो झेल होता. नवदीप सैनीनं मात्र लाबुशेनला डोईजड होऊ दिले नाही. ७३ धावांवर त्याला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सहानं अफलातून झेल घेतला. सैनीनं त्यानंतर मॅथ्यू वेडलाही ( ४) बाद करून ऑसींना दिवसातील दुसरा धक्का दिला.

पहिल्या डावातील शतकवीर स्टीव्ह स्मिथनं अर्धशतकी खेळी केली. सिडनी क्रिकेट मैदानावर सलग पाच अर्धशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठऱला.  यापूर्वी इंग्लंडच्या वॉली हॅमोंड यांनी ( १९२८-३६) सलग पाच ५०+ खेळी केल्या होत्या. भारताविरुद्ध दोन्ही डावांत ५०+ खेळी करण्याची स्मिथची ही तिसरी वेळ. त्यानं रिकी पाँटिंग आणि ख्रिस रॉजर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. स्मिथनं यावेळी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ९वे स्थान पटकावले. त्यानं डेव्हिड बून ( ७४२२ धावा) यांना मागे टाकले.  


लंच ब्रेकनंतर स्मिथनं धावांची गती वाढवली. पण, आर अश्विननं त्याला पुन्हा आपल्या फिरकीवर माघारी जाण्यास भाग पाडले. अश्विननं पायचीतची अपील केली, परंतु मैदानावरील पंचांनी नाबाद दिले. अश्विननं मोठ्या आत्मविश्वासानं कर्णधार अजिंक्य रहाणेला DRS घेण्यास सांगितले आणि त्यात स्मिथ बाद असल्याचे सिद्ध झाले. स्मिथ १६७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ८१ धावांवर माघारी परतला. स्मिथला कसोटीत सर्वाधिक ६ वेळा बाद करण्याचा भारतीय गोलंदाजाचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. त्यानंतर उमेश यादव ( ४), रवींद्र जडेजा ( ४) आणि भुवनेश्वर कुमार ( २) यांचा क्रमांक येतो. आजच्या विकेटसह अश्विननं जेम्स अँडरसनच्या ( ६ वेळा स्मिथला बाद) विक्रमाशी बरोबरी केली. स्टुअर्ट ब्रॉडनं ८, तर यासीर शाहनं ७ वेळा स्मिथची कसोटीत विकेट घेतली आहे.  


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  India vs Australia, 3rd Test Day 4 : Ravichandran Ashwin gets Steve Smith's wicket yet again in this series as he traps him lbw for 81  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.