भारताचे कसोटीवर वर्चस्व; वेस्ट इंडिजवर १७३ धावांची आघाडी

 दुसऱ्या डावात ३ बाद ९८ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 07:04 AM2019-08-25T07:04:55+5:302019-08-25T07:05:12+5:30

whatsapp join usJoin us
India lead West Indies by 173 runs | भारताचे कसोटीवर वर्चस्व; वेस्ट इंडिजवर १७३ धावांची आघाडी

भारताचे कसोटीवर वर्चस्व; वेस्ट इंडिजवर १७३ धावांची आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नॉर्थ साऊंड, अँटिग्वा : वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावांवर आटोपल्यानंतर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दुसºया डावात चहापानापर्यंत तीन बाद ९८ धावा केल्या होत्या. त्यामुळे संघाची आघाडी १७३ धावांची झाली आहे.


चहापानापर्यंत भारताने ३७ षटकांत ३ बाद ९८ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे खेळपट्टीवर आहेत. वेस्ट इंडिजला उपहारानंतर बळी मिळवण्यासाठी फार वेळ वाट बघावी लागली नाही. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेस याने मयांक अग्रवालला पायचीत केले. त्यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे संयमी खेळी करत होते. दोघांनी दुसºया गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केली. राहुल चुकीचा फटका मारून बाद झाला. त्याला देखील रोस्टन चेस याने बाद केले. त्याने ८५ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.

पुजारादेखील चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही. केमार रोचच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने ५३ चेंडूत २५ धावा केल्या. त्या आधी भारताच्या इशांत शर्मा याने ४३ धावा देत पाच बळी घेतले. त्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावात आटोपला. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर बुमराहने एक बळी मिळवला. वेस्ट इंडिजसाठी रोस्टन चेस (४८), कर्णधार जेसन होल्डर (३९), जॉन कॅम्पबेल (२३), शिमरोन हेटमायेर (३५) हे चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकले नाही.

संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव ९६.४ षटकांत सर्वबाद २९७ धावा. वेस्ट इंडिज ७४.२ षटकांत सर्वबाद २२२ धावा रोस्टन चेस ४८, शिमरोन हेटमायेर ३५, जेसन होल्डर ३९, गोलंदाजी - इशांत शर्मा ५ / ४३, बुमराह १/५५, शमी २/४८, जाडेजा २/६५.
भारत दुसरा डाव ३७ षटकांत ३ बाद ९८ लोकेश राहुल ३८, मयांक अग्रवाल १६, चेतेश्वर पुजारा २५, विराट कोहली खेळत आहे १४, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५, गोलंदाजी रोस्टन चेस - २/४२

Web Title: India lead West Indies by 173 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.