Geeta Basra cheer for Harbhajan Singh as Friendship teaser lands: ‘Everyone wants to be a hero’ | हरभजन सिंगच्या 'FriendShip' चित्रपटाचा टीजर आला; अभिनेत्री म्हणते, आजकाल प्रत्येकाला हिरो व्हायचे असते! 

हरभजन सिंगच्या 'FriendShip' चित्रपटाचा टीजर आला; अभिनेत्री म्हणते, आजकाल प्रत्येकाला हिरो व्हायचे असते! 

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) हा आता दाक्षिणात्य चित्रपटातून नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. त्याच्या पहिल्या तामिळ चित्रपट फ्रेंडशीप ( FriendShip) याचा टीजर नुकताच रिलीज झाला. भज्जीनं सोशल मीडियावर तो टीजर पोस्ट केला आहे. त्यानंतर त्याच्या सुरेश रैना, व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा देण्यास सुरूवात केली. परंतु, त्यापैकी एका ट्विटनं सर्वांचे लक्ष वेधलं. आजकाल प्रत्येकाला हिरो व्हायचे असते, असं ट्विट एका बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं आणि ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून भज्जीची पत्नी गिता बसरा ( Geeta Basra) आहे. भारतीय क्रिकेटपटूला अभिनेत्रीचा होकार मिळवण्यासाठी करावी लागली ११ महिन्यांची प्रतीक्षा!

टीझरमध्ये हरभजन सिंग कधी फाईट, कधी डान्स करताना दिसत आहे. तो या चित्रपटाच्या एका सीनमध्ये क्रिकेटचा चेंडू पकडतानाही दिसत आहे. हरभजन सिंगचा हा चित्रपट साउथमध्ये तयार झाला असून तो लवकरच हिंदीतही डब होणार आहे. ‘फ्रेंडशिप’ चित्रपट याच वर्षी रिलीज करण्यात येणार आहे. यापूर्वी हरभजन सिंगने २०१३ मध्येच पंजाबी चित्रपटात डेब्यू केले आहे. हरभजन सिंगने पंजाबी चित्रपटात एका पोलीस कर्मचाऱ्याचा अभिनय केला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचीही मोठी पसंती मिळाली होती. हरभजन अनेक वेळा टीव्ही शोतही दिसून आला आहे. हरभजनला क्रिकेटशिवाय चित्रपटातही अभिनय करायला आवडते. मात्र, हरभजनचा हा येणारा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरतो, की नाही हे पाहण्यासारखे असेल.  ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत इंग्लंडला पाठिंबा, अ‍ॅशेसमधील शत्रू टीम इंडियाविरुद्ध एकवटले; जाणून घ्या कारण
 


भज्जीच्या या टीजरवर गिता म्हणाली, ''लोजी, आजकाल प्रत्येकाल हिरो व्हायचे असते. हरभजन सिंगची ही बाजू पाहायला मिळेल, याचा विचारही केला नव्हता. हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे.''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Geeta Basra cheer for Harbhajan Singh as Friendship teaser lands: ‘Everyone wants to be a hero’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.