DC vs KKR Latest News : Nitish Rana dedicates his fifty to his father in law, who passed away yesterday, Video | DC vs KKR Latest News : Emotional; नितिश राणानं अर्धशतकानंतर का दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी? 

DC vs KKR Latest News : Emotional; नितिश राणानं अर्धशतकानंतर का दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी? 

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. DCला आपले अव्वल स्थान कायम राखायचे असले तर त्यांना KKRविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चांगली कामगिरी करावी लागेल. DCतर्फे शिखर धवन शानदार फॉर्मात आहे. त्याने गेल्या दोन्ही सामन्यांत शतके झळकावली, पण किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी संघात अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे.  

प्रथम फलंदाजीला आलेल्या KKR ला साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ९), राहुल त्रिपाठी ( १३) आणि दिनेश कार्तिक ( ३) यांना अपयश आले. नितिश राणा व संघात पुनरागमन करणाऱ्या सुनील राणा यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राणानं ३५, तर नरीननं २४ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर नितिश राणानं सुरींदर नावाची जर्सी मैदानावर झळकावून आकाशाकडे हात जोडले. सुरींदर हे नितिश राणाचे सासरे आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाले. नितिशनं हे अर्धशतक त्यांना समर्पित केलं.Delhi Capitals XI: अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरोन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, ए नॉर्ट्झे, आर अश्विन, कागिसो रबाडा, तुषार देशपांडे

Kolkata Knight Riders XI: शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, सुनील नरिन, पॅट कमिन्स, ल्युकी फर्गुसन, के नागरकोटी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: DC vs KKR Latest News : Nitish Rana dedicates his fifty to his father in law, who passed away yesterday, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.