Day-night practice match before the Test series on the tour of Australia | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेपूर्वी दिवस-रात्र सराव सामना 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेपूर्वी दिवस-रात्र सराव सामना 

मेलबोर्न : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून ॲडिलेडमध्ये सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सिडनीमध्ये एक दिवस-रात्र सराव सामना खेळणार आहे. ही लढत ११ ते १३ डिसेबर या कालावधीत सिडनी मैदानावर खेळली जाईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी भारतीय संघाच्या ६९ दिवस कालावधीच्या दौऱ्याच्या कार्यक्रम जाहीर केला. यात सिडनीमध्ये १२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या १४ दिवसांच्या विलगीकरण कालावधीचाही समावेश आहे. भारतीय संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १० नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलनंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेची सुरुवात १७ डिसेंबरपासून ॲडिलेड ओव्हलमध्ये दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या लढतीने  होणार आहे. 

बॉक्सिंग डे कसोटीत प्रेक्षकांना मिळणार प्रवेश
मेलबर्न मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. नाताळच्या दुसऱ्या दिवशी (२६ डिसेंबर)सुरू होणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे सामना म्हणतात. या कसोटीदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे. मेलबर्नच्या स्टेडियममधील आसनक्षमतेच्या २५ टक्के म्हणजेच अंदाजे २५ हजार लोकांना सामन्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा विचार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड करत आहे.स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळावा यासाठी व्हिक्टोरिया सरकार, मेलबर्न क्रिकेट क्लब आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकत्रितपणे काम करत असून कोविडपासून सुरक्षा करण्याबाबतची नवी नियमावली  तयार केली जात असल्याचे मेलबर्न क्रिकेट क्लबचे सीईओ स्टुअर्ट फॉक्स यांनी सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अर्ल एडिंग्स यांनी,‘बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका मानाची समजली जाते.  

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम 

वन-डे मालिका
पहिला वन-डे : शुक्रवार, २७ नोव्हेंबर - सिडनी (दिवस-रात्र)
दुसरा वन-डे : रविवार, २९ नोव्हेंबर -सिडनी (दिवस-रात्र)
तिसरा वन-डे : बुधवार, २ डिसेंबर - कॅनबरा (दिवस-रात्र)

 टी-२० मालिका
पहिला टी-२० : शुक्रवार, ४ डिसेंबर- कॅनबरा (रात्री)
दुसरा टी-२० : रविवार, ६ डिसेंबर-सिडनी (रात्री)
तिसरा टी-२० : मंगळवार, ८ डिसेंबर- सिडनी (रात्री)

कसोटी मालिका
पहिली कसोटी : १७ ते २१ डिसेंबर- ॲडिलेड (दिवस-रात्र)
दुसरी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर - मेलबोर्न
तिसरी कसोटी : ७ ते ११ जानेवारी - सिडनी
चौथी कसोटी : १५ ते १९ जानेवारी - ब्रिस्बेन
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Day-night practice match before the Test series on the tour of Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.