CSK vs KKR Latest News: Chennai won the toss and elected to bowl first; Opportunity for Watson again | CSK vs KKR Latest News: चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; वॉटसनला पुन्हा संधी

CSK vs KKR Latest News: चेन्नईचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; वॉटसनला पुन्हा संधी

दुबई : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) उर्वरित संघांचे समीकरण बिघडविण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्याचे पहिले लक्ष्य विजयासाठी आतुर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असेले आज उभय संघांदरम्यान लढत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

आज केकेआरला स्पेर्धेत टिकून राहण्यासाठी विजय आवश्यक असणार आहे. तसेच पहिल्या फेरीत केकेआरने सीएसकेला पराभूत केले होते. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्याची संधा आज सीएसकेसमोर असणार आहे.  केकेआरच्या खात्यावर १२ सामन्यांत १२ गुणांची नोंद आहे. त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. चेन्नई आठ संघांच्या गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. हा संघ आता प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 

स्पर्धेच्या या टप्प्यात काही संघांच्या जय-पराजयामुळे काही संघ १४ किंवा १६ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. अशा स्थितीत सरस नेटरनरेटच्या आधारावर प्ले-ऑफचे स्थान निश्चित होईल. अशा स्थितीत केकेआरसाठी मोठ्या फरकाने विजय मिळविणे महत्त्वाचे ठरेल. केकेआरसाठी चेन्नईविरुद्धची लढत सोपी राहणार नाही. चेन्नईने गेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ८ गडी राखून पराभव केला होता.  

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ- शुभमन गिल, नितिश राणा, सुनील नरीन, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, रिंकू सिंग, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्थी 

चेन्नई सुपर किंग्सचा संघ-  ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, एन जगदीशन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, मिशेल सँटनर, कर्ण शर्मा, लुंगी एंगिडी , दीपक चहर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CSK vs KKR Latest News: Chennai won the toss and elected to bowl first; Opportunity for Watson again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.