CSK vs DC Latest News : MS Dhoniच्या निर्णयावर जमैकन धावपटू भडकला; मग काय नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) शनिवारी CSKला पराभवाचा धक्का देताना अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना Play Off मधील स्थान जवळपास पक्के केले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 18, 2020 07:30 AM2020-10-18T07:30:00+5:302020-10-18T07:30:07+5:30

whatsapp join usJoin us
CSK vs DC Latest News : Poor poor poor poor choice Mahendra Singh Dhoni, Yohan Blake angree on last over decision | CSK vs DC Latest News : MS Dhoniच्या निर्णयावर जमैकन धावपटू भडकला; मग काय नेटकऱ्यांनी घेतली शाळा

CSK vs DC Latest News : MS Dhoniच्या निर्णयावर जमैकन धावपटू भडकला; मग काय नेटकऱ्यांनी घेतली शाळा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) शनिवारी CSKला पराभवाचा धक्का देताना अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना Play Off मधील स्थान जवळपास पक्के केले आहे. तेच दुसरीकडे CSKला आता उर्वरित पाचही सामने जिंकून अन्य संघांच्या नेट रनरेटवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. शिखर धवननं ( Shikhar Dhawan) नाबाद शतकी खेळी करताना दिल्लीला विजय मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनीनं अखेरचं षटक रवींद्र जडेजाला का दिलं, यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. त्यात जमैकन धावपटू योहान ब्लॅक ( Yohan Blake) यानंही धोनीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारा व्हिडीओ पोस्ट केला. मग काय नेटकऱ्यांनी त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली. 

करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. त्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस ( ५८), अंबाती रायुडू ( ४५), शेन वॉटसन ( ३६) आणि रवींद्र जडेजा ( ३३*) यांनी चेन्नईला ४ बाद १७९ धावा करून दिल्या. अॅनरिच नॉर्ट्झेनं दोन विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्राव्होला अखेरची ओव्हर का दिली नाही? MS Dhoniनं सांगितलं कारण

प्रत्युत्तरात DCची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ पहिल्याच षटकात दीपक चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे ( ८) पुन्हा एकदा अपयशी ठरला, चहरनं त्यालाही माघारी पाठवले. शिखर धवनचे झेल सोडणे इतके महागात पडतील याचा विचार चेन्नईनंही केला नसावा. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना अक्षर पटेलनं तीन खणखणीत षटकार खेचले आणि दिल्लीचा विजय पक्का केला. दिल्लीनं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. धवन ५८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०१ धावांवर नाबाद राहिला, तर पटेलनं ५ चेंडूंत ३ षटकार खेचून २१ धावा केल्या. 

CSKच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर #Bravo ट्रेंड होऊ लागले. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) अखेरचं षटक ड्वेन ब्राव्होला का दिले नाही? यावरून धोनीला ट्रोल केले गेले. त्या ट्रोलर्समध्ये योहान ब्लॅकही होता. त्यानं ट्विट केलं की,''महेंद्रसिंग धोनीची चुकीची निवड... डावखुरे फलंदाज समोर असताना तुम्ही जडेजाकडून कशी गोलंदाजी करून घेऊ शकता.''










कोण आहे योहान ब्लॅक?
१०० व २०० मीटर शर्यतीचा धावपटू आहे. त्यानं २०११च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं १०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावून सर्वात युवा धावपटूचा मान पटकाला. २०१२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं १०० व २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले. 

Web Title: CSK vs DC Latest News : Poor poor poor poor choice Mahendra Singh Dhoni, Yohan Blake angree on last over decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.