Afghans win T20 series against Windies | अफगाणचा विंडीजविरुद्ध टी२० मालिका विजय
अफगाणचा विंडीजविरुद्ध टी२० मालिका विजय

लखनौ : सलामीवीर रहमान उल्ला गुरबाजच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने निर्णायक टी२० लढतीत वेस्ट इंडिजचा २९ धावांनी पराभव केला. अफगाण संघाने सलग दुसरा सामना जिंकताना तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशी जिंकली. याआधी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विंडीजने ३-० अशी बाजी मारली होती.

अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये अफगाणीस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुरबाझच्या जोरावर अफगाण संघाने २० षटकात ८ बाद १५६ धावांची मजल मारली. यावेळी वेस्ट इंडिजच्या विजयाची अपेक्षा होती. मात्र त्यांना २० षटकात ७ बाद १२७ धावांवर रोखून अफगाणने २९ धावांनी बाजी मारली. विंडीजकडून शाय होपने ४६ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह ५२ धावांची एकाकी झुंज दिली. नवीन उल हकने २४ धावांत ३ बळी घेतले.

त्याआधी अडखळत्या सुरुवातीनंतर अफगाणिस्तानला रहमनुल्लाह गुरबाझने समाधानकारक मजल मारुन दिली. त्याने ५२ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांसह ७९ धावांचा तडाखा दिला. असगर अफगाणनेही २० चेंडूत २४ धावा फटकावल्या. शेल्डॉन कॉटेÑल, केसरिक विलियम्स व कीमो पॉल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)

Web Title: Afghans win T20 series against Windies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.