कोट्यवधीची संपत्ती तरीही आई-वडिलांना भेटत नाही; मलिंगाच्या घरच्यांचं जगणंही झालं कठीण

Lasith Malinga News: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही, वर्ल्ड क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगाची गणना सर्वश्रेष्ठ गोलंदाजामध्ये केली जाते

By प्रविण मरगळे | Published: November 26, 2020 10:42 PM2020-11-26T22:42:31+5:302020-11-26T23:04:34+5:30

whatsapp join usJoin us
10 years didn't meet the parents; It was difficult for Lasith Malinga's family to survive | कोट्यवधीची संपत्ती तरीही आई-वडिलांना भेटत नाही; मलिंगाच्या घरच्यांचं जगणंही झालं कठीण

कोट्यवधीची संपत्ती तरीही आई-वडिलांना भेटत नाही; मलिंगाच्या घरच्यांचं जगणंही झालं कठीण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देक्रिकेटमधून श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा कोट्यवधींची कमाई करतोआज मलिंगा कोट्यवधीचा मालक असून ऐशो आरामात जीवन जगत आहेइतकी श्रीमंती असूनही मलिंगाला गेली १० वर्ष आईवडिलांना भेटलाच नाही, आई शिवणकाम करून घर सांभाळते

तुमच्याकडे कोट्यवधीची श्रीमंती असली तरी आईवडिलांशिवाय तुम्ही कमीच असता. मराठीत एक म्हण आहे, स्वामी तिन्ही जगाचा पण आईविना भिकारी..सध्या हे सांगणं यासाठी गरजेचे आहे कारण कोरोना काळात अनेक माणसांचे जनजीवन उद्ध्वस्त झालं, नोकऱ्या गेल्या, कमवण्याचं साधन बंद पडलं, त्यामुळे उपासमारीची वेळ आली, पण आज आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण त्याचसोबत चीडदेखील येईल.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही, वर्ल्ड क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगाची गणना सर्वश्रेष्ठ गोलंदाजामध्ये केली जाते, मलिंगा मागील वर्षी कोलंबोमध्ये बांगलादेशविरोधात आपल्या टीमला ९१ रन्सने जिंकवत एकदिवसीय सामन्यातून निवृत्त झाला आहे. निवृत्तीनंतरही मलिंगा विविध लीगमध्ये खेळताना दिसतो.

आयपीएलमध्ये लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खूप काळापासून खेळत आहे, अलीकडे काही कारणास्तव त्याला आयपीएलमध्ये सहभागी होता आलं नाही, २२६ वनडे सामन्यात ३३८ विकेट घेत मलिंगाने वनडे इतिहासात आपलं नाव यशस्वी गोलंदाजांमध्ये कोरलं आहे. क्रिकेटमधून लसिथ मलिंगाला खूप चांगल्याप्रकारे कमाई होते. आज लसिथ मलिंगा कोट्यवधीचा मालक असून ऐशो आरामात तो जीवन जगत आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार मलिंगाचे आई वडील गॉल येथील रथगामा भागात राहतात. या परिसरात मलिंगाच्या आईवडिलांचे एक मजली घर आहे. मलिंगाची आई घरी शिवणकाम करून आपलं पोट भरते, ती पॉलिस्टरचे कपडे शिवते. मात्र सध्या मलिंगाच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे, कमवण्याचं साधन नसल्याने जीवन जगणं मुश्किल झालं आहे. मलिंगा गेल्या १० वर्षापासून स्वत:च्या आईवडिलांना भेटायला गेला नाही. मुलगा घरी का येत नाही यावर आई स्वर्णा सांगते की, कदाचित तो त्याच्या कामात प्रचंड व्यस्त असेल किंवा त्याला कोलंबोमधील जीवन आवडत असावं. तो जिथे आनंदी असेल आम्हीही आनंदात असू अशी भावना आईने व्यक्त केली. श्रीलंकेसाठी २००४ मध्ये लसिथ मलिंगाने इंटरनॅशनल डेब्यू केला होता, ३० कसोटी सामन्यात १०१, २२६ वनडेमध्ये ३३८ आणि ८४ टी-२० सामन्यात मलिंगाने १०७ विकेट्स पटकावल्या आहेत.  

Web Title: 10 years didn't meet the parents; It was difficult for Lasith Malinga's family to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.