कपडे धुण्यासाठी गेलेली महिला कालव्यात वाहून गेली; सावली तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 10:46 IST2022-09-29T10:44:41+5:302022-09-29T10:46:25+5:30

घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास ती व्याहाड शाखा कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती.

The woman who went to wash her clothes was washed away in the canal | कपडे धुण्यासाठी गेलेली महिला कालव्यात वाहून गेली; सावली तालुक्यातील घटना

कपडे धुण्यासाठी गेलेली महिला कालव्यात वाहून गेली; सावली तालुक्यातील घटना

गेवरा (चंद्रपूर) : कपडे धुण्यासाठी आसोला मेंढा प्रकल्पाच्या व्याहाड शाखा कालव्यावर गेलेली महिला वाहून गेल्याची घटना तालुक्यातील नवेगाव येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.

भारती वामन वरवाडे (२५) असे वाहून गेलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. ती वडिलांकडे नवेगाव येथे आलेली होती. घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास ती व्याहाड शाखा कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुताना अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड करून गावात वार्ता पोहोचविली. तिच्या कुटुंबातील नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शोध घेतला परंतु तिचा पत्ता लागला नाही. घटनेची तक्रार सावली पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, पोलीस शोधमोहीम राबवत आहेत. वृत्त लिहेपर्यंत महिलेचा शोध लागला नव्हता.

Web Title: The woman who went to wash her clothes was washed away in the canal