तिन जणांचा बळी घेणारा वाघ जेरबंद
By राजेश भोजेकर | Updated: May 18, 2024 15:03 IST2024-05-18T15:03:24+5:302024-05-18T15:03:58+5:30
Chandrapur : वाघाला पकडण्यात वन विभागाला यश

The tiger that killed three people is captured by forest department
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील अंकुश खोब्रागडे यांचा बळी घेणाऱ्या वाघाला शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले आहे.
ताडोबा बफर निंमढेला रामदेगीमध्ये वास्तव्य असलेला वाघ गाववस्ती जवळ येत होता. तसेच त्याने या सहा महिन्यात तीन व्यक्तींचा बळी घेतलेला आहे. त्यामुळे या वाघाला पकडण्यासाठी गावकरी संतप्त झाले असल्याने या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पाऊले उचलले होती. या वाघाला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर येथून रेस्क्यू चमुला पाचारण करण्यात आले होते.
शुक्रवारी सकाळपासून या वाघाची शोध मोहीम सुरू होती. अखेर ताडोबा बफरमधील निमढेला परिसरात हा वाघ आढळून आला असता त्याला पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे, शार्प शूटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात बेशुद्ध करून पकडण्यात आले आहे.