Chandrapur | पोहण्याचा मोह बेतला जीवावर, बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 13:54 IST2022-09-06T13:51:47+5:302022-09-06T13:54:04+5:30

चिमूर तालुक्यातील वाकर्लाजवळच्या बंधाऱ्यावरील घटना

The temptation to swim took their toll, both drowned | Chandrapur | पोहण्याचा मोह बेतला जीवावर, बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

Chandrapur | पोहण्याचा मोह बेतला जीवावर, बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

शंकरपूर (चंद्रपूर) : येथून जवळच असलेल्या वाकर्ला येथील दोन युवकांचा नाल्यावरील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

चंदू पुणेश्वर कोल्हे (२०) व आर्यन विलास बाडबुदे (१७) दोघेही रा. वाकर्ला अशी मृतकांची नावे आहेत. चंदू कोल्हे, आर्यन बाडबुदे व आणखी तिघे जण सोनटक्के यांच्या शेतात कापूस पिकाला खत टाकण्यासाठी गेले होते. पिकाला खत टाकून झाल्यानंतर पोहण्यासाठी सर्वजण आंबोली रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील बंधाऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत असलेले तीन युवक पोहून झाल्यावर बाहेर निघाले. परंतु चंदू कोल्हे व आर्यन बाडबुदे यांना पोहण्याचा मोह आवरता न आल्याने ते खोल पाण्यात गेले. मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले.

सोबत असलेल्या युवकांनी आरडाओरड केली. परंतु जवळपास कोणीच नसल्याने ते धावत गावात आले. गावकरी घटनास्थळी पोहचेपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. चिमूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे पाठविले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभुळे करीत आहे.

Web Title: The temptation to swim took their toll, both drowned