चंद्रपूरचा अभिमान! प्रणय जनबंधू बनले भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर

By राजेश भोजेकर | Updated: June 23, 2025 12:42 IST2025-06-23T12:37:14+5:302025-06-23T12:42:59+5:30

IIT इंजिनीअर ते फ्लाइंग ऑफिसर : प्रणय जनबंधू यांची प्रेरणादायी वाटचाल

The pride of Chandrapur! Pranay Janabandhu became a flying officer in the Indian Air Force | चंद्रपूरचा अभिमान! प्रणय जनबंधू बनले भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर

The pride of Chandrapur! Pranay Janabandhu became a flying officer in the Indian Air Force

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सुपुत्र प्रणय जितेंद्र जनबंधू यांनी आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय वायुसेनेत (Indian Air Force) फ्लाइंग ऑफिसर या मानाच्या पदासाठी यशस्वी निवड होऊन चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रणय जनबंधू हे चंद्रपूर शहरातील पडोली परिसरातील साई रेसीडेंसी येथील रहिवासी असून त्यांचे वडील जितेंद्र जनबंधू आणि आई निता जनबंधू हेही समाजसेवेत सक्रिय आहेत. वडिलांची देशसेवेची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार प्रणय यांनी लहानपणापासूनच मनाशी बाळगला होता.

प्रणय यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी हायस्कूल, दुर्गापूर येथे झाले असून बारावीचे शिक्षण IIT होम, नागपूर येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी IIT रुडकी (उत्तराखंड) येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. बंगलोर येथील खाजगी कंपनीत नोकरी करत असतानाच त्यांनी भारतीय वायुसेनेच्या AFCAT (Air Force Common Admission Test) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरुवातीपासूनच स्व-शिक्षणाद्वारे केली आणि पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले.

AFCAT परीक्षेत त्यांनी 2 AFSB, मैसूर या निवड मंडळातून सहभागी होत ऑल इंडिया रँकिंगमध्ये AIR – 79 प्राप्त करत फ्लाइंग ऑफिसर या पदासाठी पात्रता मिळवली आहे. कोणतेही कोचिंग न घेता, केवळ स्वतःच्या प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

प्रणय यांची ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब बनली आहे. IIT सारख्या संस्थेतून शिक्षण घेऊनदेखील देशसेवेचे स्वप्न साकार करण्याची त्यांची तळमळ सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रणय जनबंधू हे निश्चितच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले आहेत.

Web Title: The pride of Chandrapur! Pranay Janabandhu became a flying officer in the Indian Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.