कर गोळा करण्यासाठी महापालिकेने लढविली शक्कल, जाहीर केली प्रोत्साहन योजना
By साईनाथ कुचनकार | Updated: September 5, 2023 14:53 IST2023-09-05T14:51:09+5:302023-09-05T14:53:28+5:30
नियमित मालमत्ता कर व पाणी कराचा भरणा करणाऱ्यांकरिता प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे.

कर गोळा करण्यासाठी महापालिकेने लढविली शक्कल, जाहीर केली प्रोत्साहन योजना
चंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यासाठी महापालिकेने शक्कल लढविली असून यामाध्यमातून कर जमा करणे शक्य होणार आहे. दुसरीकडे सामान्य ग्राहकांनाही सूट मिळाली असल्याने त्यांचाही लाभ होणार आहे. नियमित मालमत्ता कर व पाणी कराचा भरणा करणाऱ्यांकरिता प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १० टक्के तर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.
मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी- सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ८० हजार मालमत्ताधारक असून त्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कर वसुली केली जाते. अनेक वेळा करदात्यांना कराची नोटीस पाठवूनसुद्धा ते दुर्लक्ष करतात. मात्र, आता महापालिके प्रत्येक करदात्यांना यासंदर्भात प्रोत्साहित करून कर वसूल करणार आहे.