सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत द्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:58 IST2025-07-05T16:56:53+5:302025-07-05T16:58:24+5:30
Chandrapur : नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; निमकर व बावणे रिंगणात परत

Supreme Court decision results in Chandrapur District Bank elections
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला नवी रंगत आली आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निवडणूक रिंगणात बाद केल्याच्या निर्णयाला निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.४ जुलै) स्थगिती दिली आहे. यामुळे आ गटातून राजुरा येथून माजी आमदार सुदर्शन निमकर आणि कोरपना येथून विजय बावणे यांचे नामांकन कायम राहणार असून त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निकालाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अ गटाच्या निवडणुकीने राजुरा विधानसभेतील दोन माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी विजय बावणे व नागेश्वर ठेंगणे यांच्या उमेदवारीला प्रतिस्पर्ध्याकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने माजी आमदार सुदर्शन निमकर व विजय बावणे यांचे अर्ज बाद केले. या निर्णयाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत दोघांचेही नामांकन अर्ज कायम ठेवत निवडणुकीचा मोकळा मार्ग केला आहे. यापूर्वी अविरोध निवडणुकीचा जल्लोष करणारे माजी संचालक शेखर धोटे आणि नागेश्वर ठेंगणे यांना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार असून जोरदार धक्का बसला आहे. आता निवडणूक ही चुरशीची होणार आहे. माजी बँक अध्यक्ष शेखर धोटे हे माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू आहे. तर विजय बावणे त्यांचे कट्टर समर्थक आहे. यामुळे सुभाष धोटे यांची चांगलीच अडचण झाली आहे. यासोबतच माजी आमदार सुदर्शन निमकर यांचीही थेट निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
"काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अनुमतीने कोरपना अ गटातून नामांकन दाखल केले. १२ जून २०२५ रोजी छाननीप्रसंगी प्रतिस्पर्धी शेखर धोटे यांनी नामांकनावर आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात गेले. त्यांच्या बाजूने निकाल लागल्याने माझे नामांकन बाद झाले. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने माझ्या आमच्या बाजूने निकाल दिला. आता कोरपना अ गट मधून शेखर धोटे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात परत आलो आहे."
- विजय बावणे, याचिकाकर्ते व उमेदवार, कोरपना अ गट.