धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ; भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:36 IST2024-12-17T14:34:45+5:302024-12-17T14:36:14+5:30

Chandrapur : पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Students of Dhangar community will get the benefit of the scheme; they will get food, accommodation and other educational materials | धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ; भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य मिळणार

Students of Dhangar community will get the benefit of the scheme; they will get food, accommodation and other educational materials

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता १२ वी च्या नंतर मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे.


शिक्षणात खंड पडलेला नसावा 
विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा. एका विद्यार्थ्यास ५ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ पेक्षा जास्त नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी लाभास पात्र असेल तथापि, विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.


असा करा अर्ज 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यास ऑफलाइन पद्धतीने संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपूर यांच्याकडे अर्ज करावा. या योजनेकरिता तत्काळ अर्ज सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी केले आहे.


लाभार्थी निवडीचे निकष 
विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा. इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्याथ्यनि इयत्ता १२ वी नंतर मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्याथ्यर्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा.

Web Title: Students of Dhangar community will get the benefit of the scheme; they will get food, accommodation and other educational materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.