कुठे एकाच घरात २०० मतदार तर कुठे १९०६ जणांची मतदारयादीत नावे दोनदा; निवडणूक आयोगाचा घोळ संपता संपेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:30 IST2025-10-16T15:24:03+5:302025-10-16T15:30:28+5:30
Chandrapur : काही मतदारांची दुबार नावे आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे

Sometimes 200 voters in the same house, sometimes 1906 people's names in the voter list twice; The Election Commission's confusion is not over
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर (चंदपूर): गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीकरिता ८ ऑक्टोबरला प्रकाशित करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत २४ हजार ४५६ एकूण मतदारामध्ये चक्क १९०६ मतदारांचे नावे दोनदोनदा आढळली आहेत. तर काही मतदारांची तीनदा-चारदा नावे आहे.
प्रभाग १ मध्ये ३१२३ एकूण मतदारापैकी २४५, प्रभाग २ मध्ये १८२२ पैकी १४९, प्रभाग ३ मध्ये २३११ पैकी २०३, प्रभाग ४ मध्ये २६६४ पैकी २००, प्रभाग ५ मध्ये २३०० पैकी १४९, प्रभाग ६ मध्ये १८३१ पैकी १४२, प्रभाग ७ मध्ये ३०५७पैकी २८२, प्रभाग ८ मध्ये ३१५७ पैकी २६९, प्रभाग ९ मध्ये १७५६ पैकी १३३, प्रभाग १० मध्ये २४३५ पैकी १३४ असे एकूण २४ हजार ४५६ पैकी १९०६ मतदारांची नावे दुबार आढळली आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडचांदूर नगरपरिषद हद्दीत २३ हजार ९४६ एकूण मतदार होते. विधानसभा निवडणुकीनंतर ५१० नवीन मतदारांची नावे समाविष्ट झालेली आहे. काही मतदारांची दुबार नावे आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभेचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यात आता नव्याने होणाऱ्या गडचांदर नगरपरिषद निवडणुकीत प्रकाशित झालेल्या प्रारूप यादीत तब्बल १९०६ मतदारांची दुबार नावे असल्याने निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.