विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखा; जुनी पेन्शन सुरू करा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:09 IST2024-08-01T15:08:53+5:302024-08-01T15:09:44+5:30
Chandrapur : धानोरकरांनी पहिल्याच भाषणात वेधले सभागृहाचे लक्ष

Prevent farmer suicides in Vidarbha; Start the old pension!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात सादर केला. बुधवारी चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना शेतकरी आत्महत्येचा प्रश्न, २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेसह अन्य विषय सभागृहात मांडून या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात सावत्र वागणूक मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी करून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पूर परिस्थितीच्या संदर्भानेदेखील सभागृहात चर्चा करून तात्काळ मदतीची मागणी केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम तात्काळ मिळावी, शेतकऱ्यांच्या बी बियाणावर व साहित्यांवर लावलेला जीएसटी रद्द करावा, नीटमधील पेपर फुटीच्या प्रकरण व आसएएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या संदर्भानेदेखील सभागृहाचे लक्ष वेधले- जातनिहाय जणगणना करण्यासह महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा केंद्र सरकारने सोडवावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
मराठीतून भाषण
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेमध्ये मराठीतून भाषण देत आपले म्हणणे मांडले. यावेळी शेतकरी आत्महत्या, जुनी पेन्शन योजनेवर त्यांनी भाष्य केले. दरम्यान, मोदी सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी आहे, हेसुद्धा त्यांनी सभागृहात मांडले.