न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड.धारक रांगेत !

By परिमल डोहणे | Updated: July 3, 2025 12:53 IST2025-07-03T12:51:47+5:302025-07-03T12:53:11+5:30

केवळ चार जागांसाठी ८५० वर अर्ज : उच्च शिक्षण घेतलेले हात करणार साफसफाई

M.Sc., B.Ed. holders in line for the post of court cleaner! | न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड.धारक रांगेत !

M.Sc., B.Ed. holders in line for the post of court cleaner!

परिमल डोहणे 
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे आस्थापनेवरील सफाईगार या निम्नश्रेणी पदाच्या अवघ्या चार जागांसाठी तब्बल ८५० वर अर्ज आले आहेत. यात एम.एस्सी., डी.एड., बी.एड. अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी देखील अर्ज केले आहे. परिणामी शिक्षणाच्या शिखरावर पोहोचलेले हात आता झाडू पात्रासाठी पुढे येत असल्याचे वास्तव या भरतीतून पुढे आले आहे.


सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्यातुलनेत जागाच निघत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले तरुण चपराशी, सफाईगार, शिपाई पदासाठी अर्ज करत आहेत. नुकत्याच चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या सफाईगार पदाच्या चार जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली. यात तब्बल ८५० वर अर्ज आले. सफाईगार या पदाची शैक्षणिक पात्रता केवळ सातवी आहे. तरीही पदवीधर, पदव्युत्तर, शिक्षक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी देखील अर्ज केले आहेत. यावरून बेरोजगारीने घेतलेले गंभीर रूप समोर आले आहे. 


पात्रतेचे निकष कोणते ?
सफाईगार पदाची शैक्षणिक पात्रता ही सातवी होती. यावरही उच्च शिक्षण घेतलेल्यांनी अर्ज केले. त्रुटी असलेले अर्ज अपात्र केले असले तरीही ज्यांनी पूर्ण अर्ज व माहिती भरुन अर्ज सादर केले त्यांचेही अर्ज बाद झाल्याचा आरोप अर्जदारांकडून होत असून, पात्रतेचे कोणते निकष लावले, असा प्रश्न अर्जदारांकडून होत आहे.


केवळ २५० जणांची निवड
आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर ८५० पैकी २५० जणांची निवड करण्यात आली आहे. तशी यादी सुद्धा प्रसिद्ध झाली आहे.
या अर्जदारांना बोलावून त्याच्याकडून प्रात्यक्षिक चाचणी केल्यानंतर नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: M.Sc., B.Ed. holders in line for the post of court cleaner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.