Maharashtra Election 2019 ; लोकहित जोपासणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:41+5:30
सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसेवेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

Maharashtra Election 2019 ; लोकहित जोपासणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी राहा
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी विविध कल्याणकारी योजना लागू करण्याच्या दृष्टीने एक हजार कोटी रूपयांची तरतूद जाहीर केली. नेहमीच धनगर समाजाच्या हिताची भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. सदैव लोकहित जोपासणारा हा नेता पुन्हा विधानसभेत बहुमतासह निवडून पाठवावा, असे आवाहन राज्याचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. येथील कर्मवीर मा. सां. कन्नमवार सभागृहात मंगळवारी मेंढपाळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव जानकर, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, डॉ. विकास महात्मे, डॉ. कन्नमवार, संजय कन्नावार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला धनगर समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती. जानकर यांनी शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी दिली.
धनगर समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध-मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसेवेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ राज्यातील अनेक गावांमध्ये सभागृहांचे बांधकाम करण्यासाठी राज्य सरकारने मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध केला. त्यांचे प्रेरणादायी विचार गावोगावी पोहचविण्यासाठी या सभागृहाचा उपयोग होणार आहे. अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूद आम्ही केली. ज्या १३ योजना घोषित झाल्या त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. धनगर समाजातील तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी आपण विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.