Maharashtra Election 2019 ; उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क उभारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:39+5:30
प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.

Maharashtra Election 2019 ; उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क उभारू
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घूस : गेल्या पाच वर्षात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागात तसेच चंद्रपूर शहरात विकासाची असंख्य कामे चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्णत्वास आणली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठया प्रमाणावर निधी या क्षेत्रासाठी आम्ही मंजूर करविला. पुन्हा भाजप उमेदवारांना संधी दिल्यास विविध कामे करण्याचा आमचा मानस आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात एमएसएमई पार्क उभारू, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.
ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागात तसेच चंद्रपूर शहरात विकासाची असंख्य कामे चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्णत्वास आणली आहे. कधी नव्हे एवढया मोठया प्रमाणावर निधी या क्षेत्रासाठी आम्ही मंजूर करविला. या विधानसभा क्षेत्राने, घुग्घूस शहराने माझ्यावर, नाना श्यामकुळे यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे. असाच आशिर्वाद पुन्हा एकदा आम्हाला हवा आहे. आशीर्वाद मिळताच आम्ही लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क उभारू, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्घूस येथे आयोजित जाहीर सभेत केली. विविध सभांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.