Maharashtra Election 2019 ; मतदान चिठ्ठी वाटपाचे उद्दिष्ट नियोजनबद्ध पूर्ण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:39+5:30
या बैठकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी व आलेल्या अडचणींबात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ खेमनार यांनी तयारीची माहिती दिली. चंद्र्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबाबतही माहिती त्यांनी दिली.

Maharashtra Election 2019 ; मतदान चिठ्ठी वाटपाचे उद्दिष्ट नियोजनबद्ध पूर्ण करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २१ ऑक्टोबर हा मतदानाचा दिवस असल्याची माहिती जिल्ह्यातल्या प्रत्येकाला झाली पाहिजे. त्यासाठी प्रचार-प्रसाराचा वापर करतानाच मतदान चिठ्ठी वाटप अतिशय प्रभावीपणे व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केंद्र्र प्रतिनिधींमार्फत झाले पाहिजे, असे निर्देश केंद्रीय निरीक्षकांनी रविवारी आढावा बैठकीत दिले.
यावेळी निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंग, गंगाधर बत्रा, अमित चंद्र, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. राजुरा येथील निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर, चंद्र्रपूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड, बल्लारपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर, ब्रह्मपुरीचे निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे, चिमूरचे निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ, वरोराचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी व आलेल्या अडचणींबात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ खेमनार यांनी तयारीची माहिती दिली. चंद्र्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबाबतही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघातील सखी मतदान केंद्र,पोस्टल बॅलेट, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण व त्यांना देण्याच्या सूचना, निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्रांवरील उपायोजना, मतमोजणी यंत्राची सरळमिसळ याबाबतचा अहवाल सादर केला. राघवेंद्र्र कुमार सिंग यांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.