Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:39+5:30
चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षांकडून प्रचारफेऱ्यांसह सभांचा धडका सुरू होता. शनिवारी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सायंकाळपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचार फेऱ्यांसह भेटीगाठींना ऊत आला आहे. सकाळी सहा वाजेपासूनच उमेदवारांच्या फचारफेऱ्या काढण्याचे नियोजन केले.

Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा गदारोळ शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रमुख उमेदवारांकडून कॉर्नर सभा व प्रचार फेऱ्यांसाठी जोरदारी तयारी केली आहे. या कालावधीत मतदारसंघात फिरण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केवळ ६ वाहने वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षांकडून प्रचारफेऱ्यांसह सभांचा धडका सुरू होता. शनिवारी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सायंकाळपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचार फेऱ्यांसह भेटीगाठींना ऊत आला आहे. सकाळी सहा वाजेपासूनच उमेदवारांच्या फचारफेऱ्या काढण्याचे नियोजन केले. शुक्रवारपर्यंत न पोहचलेल्या गावांना भेटी देण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक शक्ती पणाला लावणार आहेत.
जिल्ह्यात ४६३ सखी मतदार केंद्र
जिल्ह्यातील सहा मतदार संघात ४६३ सखी मतदार केंद्र राहणार आहेत. या केंद्रातील मतदान प्रक्रिया महिला अधिकारी व कर्मचाºयांद्वारे संचालित केल्या जाणार आहे. यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्र २४६, चंद्रपूर १९३, बल्लारपूर २३९, ब्रह्मपुरी ३८, चिमूर ३५५ आणि वरोरा मतदार संघात ४६३ सखी मतदार केंद्रांचा समावेश आहे. शिवाय, जिल्ह्यात १५९ आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.
१८ लाख मतदारांना ‘फोटो व्होटर स्लीप’
मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे, मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक शोधण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे जिल्ह्यातील सहा मतदार संघातील १८ लाख ७६ हजार ३५१ मतदारांना घरपोच ‘फोटो व्होटर स्लीप’ पोहचविण्याची कामे जोरात सुरू आहे.
१० लाख कुटुंबांना व्होटर गाईड
मतदान प्रक्रियेची माहिती मतदारांना व्हावी, याकरिता आयोगाद्वारे माहिती पुस्तिका (व्होटर गाईड) तयार करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १० लाख कुटुंबांपर्यंत ही पुस्तिका पोहचण्यात येत आहे. केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांद्वारे पुस्तिका वितरण केल्या जात आहे. २० तारखेपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
१५ उमेदवारांना नोटीस
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांमार्फत दोन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे निवडणूक खर्च तीनदा तपासण्यात येणार असून खर्च सादर न केलेल्या १५ उमेदवारांना नोटीस बजावल्या आहेत.
जवानांच्या सहा तुकड्या दाखल
जिल्ह्यातील १८ लाख ७६ हजार ३५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हावी, याकरिता केंद्रीय पोलीस दल तसेच निमलष्करी दलाच्या सहा तुकड्या जिल्ह्यात दाखल झाले.