Maharashtra Election 2019 ; कमी मतदान झालेल्या क्षेत्राची वाढविणार टक्केवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:34+5:30
२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले.

Maharashtra Election 2019 ; कमी मतदान झालेल्या क्षेत्राची वाढविणार टक्केवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक इतिहासात चंद्रपूर क्षेत्रात २०१४ पर्यंत सर्वाधिक कमी मतदान झाले होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जागृतीपर विविध उपक्रम सुरू करण्यात आले.
२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ चिमूर मतदार संघ ७४.५५ टक्के, राजुरा ७०.८३ टक्के, वरोरा ६४.८१ टक्के, बल्लारपूर ६३.१८ तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा मतदार संघ ५४.०७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १८ लाख ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झाली आहे. एक लाख १३ हजार मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारांच्या वाढीत २२ मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये नऊ लाख ६० हजार ७२७ पुरुष तर नऊ लाख १८ हजार ९३८ महिला मतदारांचा समावेश आहे. २०१९ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सहा मतदार संघात एकूण ६६.५० टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा मतदार संघात ६९.६१ टक्के, बल्लारपूर ६४.१६ टक्के, वरोरा ६३.३५ टक्के, चंद्रपूर ५३.१० टक्के, चिमूर ७३.५२ टक्के, ब्रह्मपुरी ७५.२७ टक्के मतदान झाले होते. आकडेवारी बघितल्यास चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी इतर मतदार संघाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले. जागृतीपर विविध उपक्रम व अभियानाच्या माध्यमातून शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता गावागावांत संबंधीत यंत्रणा कार्य करीत आहे.
महाविद्यालयांवर लक्ष केंद्रीत
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यापूर्वी विशेष प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्याच्या पाच विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत कमी मतदान झाले. खरे तर या क्षेत्रात चंद्रपूर शहराशी संबंधीत असणारी शेकडो गावे आहेत. शहरातील नवीन विचारांचा परिणाम युवक-युवतींवर होणे अपेक्षित होते. मात्र, उलट प्रकार दिसून आला. यंदा हे चित्र बदलू शकते.