Maharashtra Election 2019 : झेंडे,दुपट्ट्यांचे महत्त्व वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:01:03+5:30
कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहेत.

Maharashtra Election 2019 : झेंडे,दुपट्ट्यांचे महत्त्व वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कुठलीही निवडणूक म्हटली की, विविध राजकीय पक्षांतील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारावर जोर असतो. तेवढाच प्रचार साहित्यावर सुध्दा असतो. विधानसभा निवडणुकीसाठी अखेरचे काही दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयामध्ये तयारीला वेग आला आहे. बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमातून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे.
कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहेत.
प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांसाठी राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक, बॅनर उपलब्ध केले जात आहे. आपापल्या पक्षाच्या किंवा सहकारी पक्षाच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयामार्फत होत आहे.
उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षाकडून वितरीत केले जात आहे. काही पक्षाच्या उमेदवारांना पक्ष कार्यालयातून तर काहींना थेट उपलब्ध केले जात आहे. मतदार याद्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदारयाद्याचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बुथनिहाय जबाबदाºया निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
साहित्यावर खर्च
प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु साहित्याची कमतरता भासू नये यासाठी काही उमेदवारांनी स्वत: खर्च करून साहित्याची जुळवाजुळव केली आहे. अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना प्रचार साहित्यावर स्वत: खर्च करावा लागत आहे. मतदार आकर्षित होईल, अशा साहित्याची मागणी अधिक आहे.