जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:43 IST2025-04-03T15:41:06+5:302025-04-03T15:43:07+5:30

Chandrapur : जिल्ह्याभरात जवळपास शेकडो थंड पाण्याची जार देण्याचे प्रकल्प असल्याची माहिती आहे.

Is Water from a jar causing disease? Citizens, take care of the purity of water | जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी

Is Water from a jar causing disease? Citizens, take care of the purity of water

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
लग्नकार्य तसेच विविध सोहळ्यांमध्ये जारच्या पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. अवघ्या ३० रुपयांत २० लिटर स्वस्त आणि थंड पाणी मिळत असल्याने जारचे पाणी खरेदीकडे यजमानांचा कल असतो. मात्र, या पाण्याच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हे जारचे पाणी आजार तर देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


आता घरगुती छोटा-मोठा कार्यक्रम असो किंवा शासकीय वा खासगी कार्यालयातसुद्धा जारच्याच पाण्याचा वापर केला जातो. अनेकजण तर घरीपण दररोज कॅनचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करतात. त्यामुळे शहरापासून ते गावखेड्यापासून जारच्या पाण्याची दुकाने दिसून येतात. वास्तविक, पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी थंड करण्याच्या मशीनमध्ये थंड केल्यानंतर जारमध्ये भरले जाते. परंतु, बरेचदा जारची नीट स्वच्छता केली जात नाही. महिनोन्महिने त्याच जारमध्ये पाणी भरले जाते. कुठे-कुठे तर पाणी थंड करण्यासाठी इथिलिन ग्लायकॉल नावाचा घातक द्रव पदार्थ टाकून पाणी थंड करण्याची प्रक्रिया करीत आहेत. हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळणारा असून, किडनी तसेच हृदयावर गंभीर स्वरूपाचा परिणाम करणार आहे. 


२० ते ३० रुपयांत जारचे पाणी
मोठ्या शहरापासून गावखेड्यातही जारच्या पाण्याचे प्रोजेक्ट आहेत. २० ते ३० रुपयाला एक जार विक्री केली जाते.


कारवाईअभावी जार संचालक बेपर्वा
थंड पाण्याची जार वितरित करण्याची पाण्याच्या शुद्धतेबाबत कुणी तपासणी करत नाही वा कारवाई करत नाही. त्यामुळे हे पाणी वितरित करणारे बेपर्वा झाले असून शुद्धतेकडे दुर्लक्ष करत पाण्याचा पुरवठा करतात.


पाण्याच्या शुद्धतेची जबाबदारी कोणाची ?
पाणी वितरण करणारे शुद्ध व थंडगार पाणी वितरित करण्याचा दावा करत असतात. मात्र त्याच्या शुद्धतेबाबत कुणीच काही विचारणा करत नसल्याने जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण होतो.


तपासणी कोण करतो?
पाणी शुद्ध आहे की नाही, याबाबतची तपासणी करणे गरजेचे असताना कन्हैया यांची उपस्थिती होती. 

Web Title: Is Water from a jar causing disease? Citizens, take care of the purity of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.