चंद्रपूरच्या १ हजार ११६ गावांमध्ये एकाच दिवशी सुरू झाली आरोग्य जनजागृती
By साईनाथ कुचनकार | Updated: May 11, 2023 15:36 IST2023-05-11T15:33:37+5:302023-05-11T15:36:09+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

चंद्रपूरच्या १ हजार ११६ गावांमध्ये एकाच दिवशी सुरू झाली आरोग्य जनजागृती
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव सामाजिक समावेशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १ हजार ११६ गावांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती सुरू करण्यात आली. यामध्ये किशोरवयीन मुली, स्तनदा माता व गरोदर मातांना आरोग्य, पोषण आहार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत आरोग्य, पोषण आहार या विषयावर जागृती करण्यात आली. युवावस्थेतील मुलींच्या समस्या, पोषण, आरोग्यविषयक काळजी व त्यावरील उपाय याबाबत समुदाय संसाधन व्यक्तींनी जनजागृती केली. पोषणाचे महत्त्व आणि विविध जीवनसत्त्वाची शारीरीक वाढीसाठी गरजा आणि पर्यायी भाजीपाला, फळे, दूध याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्तनदा माताांचे आरोग्य आणि लहान बाळांच्या पोषणाबाबत काळजी यावरही १ हजार ११६ गावांमध्ये एकाच दिवशी गावागावात जनजागृती करण्यात आली. काही ठिकाणी आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. सभा, फलके, बैठका, तसेच गावागावात मिरवणूक काढण्यात आली.