दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा गुरुदेव सेवा मंडळाने निदर्शने करून दर्शविला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 17:35 IST2021-06-04T17:35:33+5:302021-06-04T17:35:50+5:30
दारुबंदी कायम ठेवण्याची केली मागणी

दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा गुरुदेव सेवा मंडळाने निदर्शने करून दर्शविला विरोध
चंद्रपूर : चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतलेल्या दारुबंदी हटाव निर्णयाचा आता रस्त्यावर उतरून विरोध सुरू झाला आहे. गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्त्यानी दारुबंदी कायम राखण्याची मागणी करत शुक्रवारी निदर्शने केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळ संघटनेची स्थापना केली होती.
विदर्भात या संघटनेला ग्रामीण भागात मोठे समर्थन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्त्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला. कोरोना काळात जनहिताचे-जीव वाचविणारे निर्णय अपेक्षित असताना सरकारने उफराटे निर्णय घेतल्याची भूमिका त्यांनी मांडली. सरकारने ही दारुबंदी कायम ठेवावी, यासाठी मंडळाच्या वतीने सर्वशक्तीने प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.