विद्युत करंट लागून चार जण ठार, एक जखमी
By राजेश भोजेकर | Updated: September 11, 2024 14:09 IST2024-09-11T14:08:27+5:302024-09-11T14:09:07+5:30
Chandrapur : दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात घडली घटना

Four killed, one injured due to electrocution
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील पुंडलिक मानकर (६५) चीचाखेडा, प्रकाश राऊत (४५), युवराज डोंगरे (४३),. नानाजी राऊत (५५) सर्व रा. गणेशापुर. यांचा विद्युत स्पर्शाने मृत्यू तर सचिन सुधाकर नन्नावरे (३५) गणेशपुर जखमी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली.
गणेशपुर येथील राऊत यांच्या शेतात धान पिकाला खत मारत असताना गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या शेतात ही घटना घडली.राऊत यांची एकूण आठ एकर शेती आहे. शेताच्या चारही बाजूला झटका लावण्यात आला आहे. शिकारीच्या लालसेने झटकामध्ये कुणीतरी जिवंत विद्युत प्रवाह सोडला असावा. त्यामुळे शेताच्या चार बाजूला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन चौघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.