हेटी येथील सरस्वती जिनींगला आग, कापूस जळाला
By राजेश भोजेकर | Updated: April 28, 2023 10:02 IST2023-04-28T09:58:09+5:302023-04-28T10:02:15+5:30
शॉर्टसर्किटमुळे कापसाच्या गंजीला आग

हेटी येथील सरस्वती जिनींगला आग, कापूस जळाला
राजेश भोजेकर, चंद्रपूर: कोरपना-वणी राज्य महामार्गवरील, कोरपना जवळील हेटी येथील जय सरस्वती जीनींग येथे शॉर्टसर्किटमुळे कापसाच्या गंजीला शुक्रवार दिनांक २८ ला पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
प्राप्त माहितीनुसार, पहाटे लागलेल्या अचानक शॉर्टसर्किटमुळे आगीत जवळपास शंभर क्विंटल कापूस जळून खाक झाला. त्याची अंदाजे किंमत सात लाख रुपये वर्तविण्यात येत आहे. आगीची घटना घडताच लागलीच कोरपना नगर पंचायत च्या अग्निशमन वाहनाने पाचारण करून आग नियंत्रणात आणली. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.