वीज पडून जनावरे दगावली? ऑनलाइन नोंदणी असेल तरच तातडीची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:36 IST2025-07-10T16:36:21+5:302025-07-10T16:36:50+5:30

शासनाच्या नैसर्गिक आपत्तीतून मदत : मात्र योजनेच्या माहितीचा अभाव

Animals killed by lightning? Emergency help only if there is online registration! | वीज पडून जनावरे दगावली? ऑनलाइन नोंदणी असेल तरच तातडीची मदत!

Animals killed by lightning? Emergency help only if there is online registration!

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना सरकारच्या नैसर्गिक आपत्तीतून तातडीने मदत केली जाते; मात्र यासाठी जनावरांची ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना या अटीची माहिती नसते. त्यामुळे दुर्घटनेनंतर मदतीपासून ते वंचित राहतात. संबंधित गावातील शासकीय पशु चिकित्सालयातील डॉक्टर, गावातील कृषी सेवक यांनी ऑनलाइन नोंदणीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे.


पशुधन मालकांनी त्यांच्या जनावरांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीमुळे जनावरांची माहिती शासनाला उपलब्ध होते. विविध योजनांसाठी अनुदान, लसीकरण आणि आरोग्य सेवा पुरवणे ही कामेदेखील सोपी होतात. जनावरांचे इअर टॅगिंग ही त्यापैकीच एक मोहीम आहे. त्यातून आपत्तीकाळात पशुपालकाला मदत तत्काळ देणे शासनाला शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.


शेतकऱ्यांची समस्या काय?
योजनेच्या माहितीचा अभाव ही शेतकऱ्यांची मूळ समस्या आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी ग्रामीण भागात अनेक वेळा शेतवस्त्यांवर इंटरनेटही उपलब्ध होत नाही. नेट कॅफेमध्ये नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतात.


जनावरांच्या ऑनलाइन नोंदणीचा काय होतो फायदा?
नोंदणीमुळे शेतकऱ्यांकडील जनावरांची प्रजाती, त्यांचे आजार, त्यावरील उपचार, संबंधित जिल्ह्यातील किंवा गावातील जनावरांची संख्या आदी तपशील शासनाकडे जमा होतो. आपत्ती प्रसंगी तातडीने मदत मिळण्यास मदत होते.


ऑनलाइन नोंदणी कशी?
या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या 'इनाफ' (इन्फर्मेशन नेटवर्क फॉर प्रॉडक्टिव्हिटी अँड हेल्थ) या प्रणालीत जनावरांचे टॅगिंग करण्यात येऊन त्यांची सर्व माहिती नोंदवली जाते. 


ऑनलाइन नोंदणी हवीच!
जनावरांची ऑनलाइन नोंदणी असल्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच सरकारलाही होतो. जनावरांचे लसीकरण, स्थानिक पशुचिकित्सालयात जनावरांसाठी आरोग्य सुविधा, महापुरासारख्या आपत्ती प्रसंगी जनावरांचे व्यवस्थापन, अशी कामे करणे सरकारला शक्य होते.


लागणारी कागदपत्रे ?
भारत पशुधन प्रणालीत जनावरांच्या नोंदणीसाठी पशुपालकांना पत्ता, मोबाइल नंबर, आधार यासह जनावरांची प्रजात, त्यांचे वय आदी तपशील अपलोड करावा लागतो.
 

Web Title: Animals killed by lightning? Emergency help only if there is online registration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.