आनंदवनमधील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
By राजेश भोजेकर | Updated: June 30, 2024 15:27 IST2024-06-30T15:27:22+5:302024-06-30T15:27:40+5:30
वरोरा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

आनंदवनमधील युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन येथिल 24 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीने रविवारी पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी 8:30 च्या दरम्यान बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे , आरोपी 4 जुलैपर्यंत 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत होता. आरती चंद्रवंशी या तरुणीचा बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केला होती. प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान माळी याला गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून या घटनेचा तपास पुढील यंत्रणा करीत आहे.