शिकारीच्या शोधात गेलेल्या पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू; भद्रावती तालुक्यातील चालबर्डी शेतशिवारातील घटना
By राजेश भोजेकर | Updated: January 19, 2024 19:11 IST2024-01-19T19:10:52+5:302024-01-19T19:11:08+5:30
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले.

शिकारीच्या शोधात गेलेल्या पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू; भद्रावती तालुक्यातील चालबर्डी शेतशिवारातील घटना
चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील चालबर्डी येथील पहीत शेत शिवारात शिकारीच्या शोधात असलेल्या पट्टेदार वाघाचा कडगरे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक १८ ला तीन दिवसानंतर उघडकीस आली हा पट्टेदार वाघ पाच वर्षे वयाचा असून नर जातीचा आहे. चालबर्डी येथील शेत सर्वे क्रमांक ५४ मध्ये शिकारीच्या शोधात असताना कटगरे नसलेल्या विहिरीत पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला ही घटना तीन दिवसानंतर वनरक्षक जे ई देवगडे यांना दिनांक १८ ला माहिती झाली.
त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांना दिली घटनास्थळी सहाय्यक वन संरक्षक जी आर नायगमकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता नर जातीचा पट्टेदार वाघ हा कुजलेल्या अवस्थेत आढळला त्याचे शव टीटीसी चंद्रपूर येथे नेण्यात आले तिथे डॉ. कुंदन पोडचलवार, डॉ. आर एस रोडे या पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. घटनेचा पुढील तपास वन अधिकारी करीत आहे.