Zee चं Sony Pictures मध्ये विलिनिकरण होणार; वृत्तानंतर गुंतवणूकदारांना ५,७०० कोटींचा फायदा 

By जयदीप दाभोळकर | Published: September 22, 2021 01:21 PM2021-09-22T13:21:56+5:302021-09-22T13:23:29+5:30

Zee Entertainment, Sony Pictures Deal : शेअर्सच्या किंमत २३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ. शेअरचे दर ५२ आठवड्यांच्या ऑलटाईम हायवर. गुंतवणूकदारांची झाली चांदी.

Zee entertainment will be merged into Sony Pictures india Investors profit of Rs 5700 crore sahare market | Zee चं Sony Pictures मध्ये विलिनिकरण होणार; वृत्तानंतर गुंतवणूकदारांना ५,७०० कोटींचा फायदा 

Zee चं Sony Pictures मध्ये विलिनिकरण होणार; वृत्तानंतर गुंतवणूकदारांना ५,७०० कोटींचा फायदा 

Next
ठळक मुद्देशेअर्सच्या किंमत २३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ.शेअरचे दर ५२ आठवड्यांच्या ऑलटाईम हायवर. गुंतवणूकदारांची झाली चांदी.

देशाच्या मनोरंजन विश्वातून एक मोठं वृत्त समोर आलं होतं. झी एन्टरटेन्मेंट (Zee Entertainment) ने सोनी पिक्चर्स (Sony India) इंडियामध्ये विलिनीकरण करण्याचा करार केला आहे.  Zee Entertainment  नेच या संदर्भातील माहिती दिलीह. या व्यवहारानंतर देखील पुनीत गोयंका हे पुढील पाच वर्षे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत. (Zee Entertainment announces merger with Sony India). दरम्यान, या वृत्तानंतर झी एन्टरटेन्मेंटच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. झी एन्टरटेन्मेंटच्या शेअर्समध्ये तब्बल २३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली असून गुंतवणूकदारांना ५ हजार ७०० कोटींपेक्षा अधिक फायदा झाला आहे. 

बुधवारी या वृत्तानंतर झी एन्टरटेन्मेंटच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. कामकाजादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये २३.७१ टक्क्यांची वाढ झाली. या वाढीनंतर कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या ऑल टाईम हायवर पोहोचला होता. तसंच तो ३१९.५० रूपयांवर गेला. 

गुंतवणूकदारांना मोठा फायदा
ZEEL आणि SPNI यांच्यादरम्यान एक्सक्ल्युसिव्ह नॉन बाईंडिंग टर्म शीट करार करण्यात आला आहे. या डीलचा ड्यू डिलिजन्स पुढील ९० दिवसांमध्ये पूर्ण होईल. तसंच या डीलमुळे गुंतवणूकदारांचीही चांदी झाली आहे. झी एन्टरटेन्मेंटच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीनंतर गुंतवणूकदारांना ५७८२.३१ कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. मंगळवारी बीएसई इंडेक्सवर झी एन्टरटेन्मेंटचा शेअर २५५.६५ रूपयांवर बंद झाला होता. या दरावर कंपनीचं मार्केट कॅप २४,५५५.५८ कोटी रूपये होतं. बुधवारी शेअरमध्ये तेजीनं कंपनीचं मार्केट कॅप ५७८२.३१ कोटी रूपयांनी वाढून ३०,३३७.८९ कोटी रूपये झालं. 

Web Title: Zee entertainment will be merged into Sony Pictures india Investors profit of Rs 5700 crore sahare market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app