बचतीची सवय आणि स्मार्ट गुंतवणुकीमुळे आयुष्यातील अनेक मोठी उद्दिष्टे सहज साध्य होतात. जर तुमचं वय २६ वर्षे असेल आणि वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत २ कोटी रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर आतापासूनच तुम्हाला स्मार्ट फायनान्शिअल प्लॅनिंगची गरज आहे. एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, वयाच्या ५० व्या वर्षी २ कोटी रुपयांचं उद्दिष्ट गाठण्यासाठी दरमहा किती रुपयांची एसआयपी करावी लागेल? हे एका साध्या कॅलक्युलेशनमधून सहज समजू शकतं.
म्युच्युअल फंडांमध्ये परताव्याची शाश्वती नसते. परंतु यावर १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर तुम्ही आज २६ वर्षांचे असाल तर यापुढे तुम्हाला पुढील २४ वर्षांसाठी एसआयपीमध्ये ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. जर तुम्ही १२% वार्षिक परतावा गृहीत धरला तर एंजल वन एसआयपी कॅलक्युलेटरनुसार जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा ₹ १२००० ची गुंतवणूक करता तेव्हा पुढील २४ वर्षांनंतर तुमच्याकडे २,००,७२,२४६ रुपयांचा फंड असेल. म्हणजेच आजपासून दरमहा १२,००० रुपयांची एसआयपी सुरू केल्यास वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत तुम्ही २ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता.
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
जर उशीर केला तर...
जर तुम्ही ५ वर्षांनंतर म्हणजेच ३१ व्या वर्षी एसआयपी सुरू केली तर २ कोटी मिळवण्यासाठी तुम्हाला २२,९०० रुपयांची महिन्याला एसआयपी करावी लागेल. म्हणजेच जितकी लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल तितकी तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल. त्यामुळेच लवकर गुंतवणूक करण्याचा निर्णयच योग्य ठरेल.
एसआयपीमधील गुंतवणूकीचे फायदे
एसआयपीमुळे जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा अधिक युनिट्स खरेदी करता येतात आणि जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा कमी युनिट्स खरेदी केले जातात. एसआयपी आपल्याला शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनवते. एकदा एसआयपी सुरू केल्यानंतर तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात जमा करावी लागते आणि ही सवय कायम राहते. एसआयपी हा गुंतवणुकीचा अत्यंत सोयीस्कर मार्ग आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)