Starbucks Denies Collaboration with Dolly Chaiwala: नागपुरातील प्रसिद्ध चहावाला आणि इंटरनेट सेन्सेशन डॉली चायवाला याला स्टारबक्स इंडियानं ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्याची माहिती सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या मीममधून समोर आली होती. या व्हायरल दाव्यामुळे इंटरनेटवर बरीच खळबळ उडाली होती, पण आता कंपनीनं अधिकृतरित्या या वृत्तांचंखंडन केलंय.
स्टारबक्स इंडियाने सोमवारी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलं. डॉली चायवाला ऊर्फ सुनील पाटील याच्याशी कंपनीचा कोणतंही ब्रँड कोलॅबरेशन नाही. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये स्टारबक्स कपवर डॉली चायवालाचं नाव लिहिलेलं दिसत होतं आणि त्यात डॉली चायवालाचाही फोटो होता. डॉली आता स्टारबक्सचा ब्रँड अॅम्बेसेडर बनल्याचा दावा अनेक सोशल मीडिया युजर्सनी केला होता.
Dolly Chaiwala became the brand ambassador of Starbucks India pic.twitter.com/YjN3G2wNWW
— Dixit Dave (@dixit_dave_) April 1, 2025
काय आहे प्रकरण?
हे मीम सर्वप्रथम सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स युजर दीक्षित दवे यांनी शेअर केलं होतं. यात त्यांनी डॉली चायवाला स्टारबक्स इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनल्याचं म्हटलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर मीम्स आणि कमेंट्सचा पूर आला आहे, परंतु आता स्टारबक्सनं यावर आपलं मौन सोडलंय. आम्ही काही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या आहेत ज्यामध्येTATA Starbucks नं एक ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त केल्याचं म्हटलंय. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की TATA Starbucks चा भारतात कोणताही अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर नाही आणि विशेषतः आमचा डॉली चायवालाशी कोणताही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
व्हायरल झालेला फोटो एका थर्ड पार्टीं तयार केलेल्या मीमचा भाग आहे, ज्याला काही लोकांनी खरं कॅम्पेन समजलं. आम्ही नेहमीच अचूक आणि प्रामाणिक माहिती प्रदान करण्यावर विश्वास ठेवतो, असंही स्टारबक्सनं स्पष्ट केलंय.