Lokmat Money > बिझनेस न्यूज > आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका

आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका

आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणारे. परंतु त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:29 IST2025-05-16T11:27:22+5:302025-05-16T11:29:29+5:30

आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणारे. परंतु त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

We will continue to invest in India Apple s tim cook big blow to Trump Indian government | आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका

आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका

आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणारे. परंतु त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. यात त्यांनी ॲपलला भारतात आयफोन तयार न करण्याचा सल्ला दिलाय. भारताला त्यांच्या हिताची काळजी घेऊ द्या, असं ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कूक यांना सांगितलं. परंतु यावर एक मोठी अपडेट समोर येतेय. दरम्यान भारतासाठीच्या गुंतवणूक योजनेत कोणताही बदल होणार नसल्याचं कंपनीनं भारताला आश्वासन दिलंय. सीएनबीसी टीव्ही १८ नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ॲपलच्या भारतातील गुंतवणुकीच्या योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि कंपनीनं भारत सरकारला आश्वासन दिलंय की भारताचा एक प्रमुख मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणून वापर करण्याच्या वचनबद्धतेचं आश्वासन कंपनीनं दिलं आहे.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला विश्वास

या वक्तव्यानंतरही भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आत्मविश्वासानं भरलेला आहे. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाचे (ईएलसीआयएनए) सरचिटणीस राजो गोयल म्हणाले की, "यामध्ये किंचित घट होऊ शकते, परंतु मला वाटत नाही की त्याचा भारतावर तितकासा परिणाम होईल." गोयल यांनी ट्रम्प यांचं वक्तव्य केवळ एक वक्तव्य असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपली भूमिका बदलू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?

काय म्हणालेले ट्रम्प?

"मी काल टिम कुक यांच्याशी चर्चा केली. आम्ही तुमची चांगली काळजी घेत आहोत. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बनवत आहात. परंतु तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारत आहात, असं मी ऐकलंय. तुम्ही ते भारतात उभारू नये असं मला वाटतं. जर तुम्हाला भारताची मदत करायची असेल तर ठीक आहे. परंतु भारत हा जगातील सर्वाधिक शुल्क आकारणारा देश आहे. त्या ठिकाणी विक्री करणं कठीण आहे. भारतानं आम्हाला आमच्या काही सामानांवर शुल्क न आकारण्याची ऑफर दिली आहे," असं ट्रम्प म्हणाले होते. दोहा येथे ट्रम्प यांनी अनेक व्यावसायिकांची भेट घेतली.

"आम्ही तुमच्या चीनमधल्या उत्पादन प्रकल्पांना वर्षानुवर्ष सहन केलं. परंतु आता तुम्ही भारतात उत्पादन प्रकल्प उभारू नये असं आम्हाला वाटतं. भारत आपली काळजी घेऊ शकतो. तो चांगलं करू शकतो. तुम्ही अमेरिकेतच उत्पादन प्रकल्प उभारा," असं ट्रम्प यांनी नमूद केलं होतं.

Web Title: We will continue to invest in India Apple s tim cook big blow to Trump Indian government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.