Lokmat Money > बिझनेस न्यूज > मे महिन्यात कामावर परतले दोन कोटी कामगार, पण अद्याप १० कोटी श्रमिकांना नाही रोजगार

मे महिन्यात कामावर परतले दोन कोटी कामगार, पण अद्याप १० कोटी श्रमिकांना नाही रोजगार

२५ मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे १२.२० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यामधील सुमारे दोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 09:01 AM2020-05-28T09:01:45+5:302020-05-28T09:04:49+5:30

२५ मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे १२.२० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यामधील सुमारे दोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे.

Two crore workers returned to work in May, but 10 crore workers are still unemployed BKP | मे महिन्यात कामावर परतले दोन कोटी कामगार, पण अद्याप १० कोटी श्रमिकांना नाही रोजगार

मे महिन्यात कामावर परतले दोन कोटी कामगार, पण अद्याप १० कोटी श्रमिकांना नाही रोजगार

Highlightsदोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे.लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागलेल्या १० कोटी कामगार, कर्मचाऱ्यांना अद्याप पुन्हा रोजगार  मिळालेला नाही. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CIME) च्या ताजा अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूल रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशातील बहुंतांश उद्योगधंदे बंद झाले होते. त्यामुळे सुमारे १२ कोटी कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीपासून लॉकडाऊनमध्ये अंशता सवलत मिळण्यास सुरुवात झाल्यापासून सुमारे दोन कोटी मजूर कामावर परतले आहेत. त्यामुळे देशातील रोजगाराचा दर २ टक्क्यांनी वाढून २९ टक्के झाला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात हाच दर २७ टक्के होता. मात्र अद्याप १० कोटी कर्मचारी, कामगारांना अद्याप रोजगार पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ही माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CIME) च्या ताजा अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अहवातून देण्यात आलेल्या माहितीनुसार २५ मार्च रोजी सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे १२.२० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला होता. यामधील सुमारे दोन कोटी कामगार पुन्हा कामावर आले आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा रोजगार मिळाला आहे.

मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागलेल्या १० कोटी कामगार, कर्मचाऱ्यांना अद्याप पुन्हा रोजगार  मिळालेला नाही. या लोकांना पुन्हा कामावर आणून रोजगार मिळवून देणे आव्हानात्मक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ज्यावेळी मागणी आणि उत्पादन वाढू लागेल, त्यावेळीच या कामगारांना परत कामावर आणणे शक्य होईल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 CIME च्या अहवालानुसार मे महिन्यात(कामगार सहभाग दर) एलपीआर वाढला आहे. १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात हा दर ३८.८ टक्के झाला होता. मार्च महिन्यात एलपीआर ४१.९ टक्के होता. मात्र एप्रिल महिन्यामध्ये तो घटून ३५.६ टक्के झाला होता. त मे महिन्याच्या सुरुवातील त्यात अजूनच घट झाली होती. सीएमआयईच्या अहवालानुसार मजुरांनी आपल्या इच्छेने स्थलांतर केले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा कामावर परतत आहेत. तसेच त्यांना रोजगारही मिळत आहे.

Web Title: Two crore workers returned to work in May, but 10 crore workers are still unemployed BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.