Tata steel: टाटांच्या या कंपनीला 16 हजार कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांचे पैसे झाले 'चौपट'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:43 PM2021-09-22T12:43:43+5:302021-09-22T12:44:15+5:30

Tata steel lost 16000 crore market cap: एकीकडे टाटा मोटर्स, टाटा पावरने गुंतवणूकदारांना सोन्याचे दिवस दाखविलेले आहेत. तर टाटा स्टीलचे शेअर पडल्याने गुंतवणूकदारांना तोटा झाला आहे. 

Tata steel share drops in last 5 days; investor's making 4 times money in one year | Tata steel: टाटांच्या या कंपनीला 16 हजार कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांचे पैसे झाले 'चौपट'

Tata steel: टाटांच्या या कंपनीला 16 हजार कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांचे पैसे झाले 'चौपट'

Next

टाटा ग्रुपच्या अन्य कंपन्या नफा कमवत असताना पोलाद उद्योगात असलेल्या टाटा स्टीलने (Tata steel) गुंतवणूकदारांना घाम फोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून टाटा स्टीलच्या शेअरमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. गेल्या पाच दिवसांत 10 टक्क्यांहून अधिक रुपयांनी शेअर घसरला आहे. यामुळे कंपनीच्या बाजारमुल्याला जवळपास 16 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. परंतू वर्षाचा फायदा पाहता गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. (Tata steel lost 16000 crore market cap; investers also suffered.)

TaTa ने केले गुंतवणूकदारांना मालामाल; या शेअरने वर्षभरात पैसे केले 'डबल'

गेल्या पाच दिवसांत टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 157.10 रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजे कंपनीचे 100 शेअर ठेवणाऱ्या गुंतवणूकदाराला 15710 रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे टाटा मोटर्स, टाटा पावरने गुंतवणूकदारांना सोन्याचे दिवस दाखविलेले आहेत. तर टाटा स्टीलचे शेअर पडल्याने गुंतवणूकदारांना तोटा झाला आहे. 

सोमवारी झालेल्या घसरणीमुळे टाटाचे बाजारमुल्य 150824.30 कोटी रुपयांवर आले. शुक्रवारी बाजार बंद होताना हे बाजारमुल्य 1,66,702.75 कोटी रुपये होते. मंगळवारी देखील टाटा स्टीलचे शेअर घसरले होते. आज हा शेअर 1,299.40 वर सुरु झाला. तर मार्केट कॅप 1.58 लाख कोटींवर गेले आहे. आतापर्यंतच्या ट्रेडिंगमध्ये शेअरने 1,313.90 ची उंची गाठली. सध्या हा शेअर 1,308.05 वर ट्रेड करत आहे. 13 सप्टेंबरला हाच शेअर 1463 वर होता. 

Ratan Tata: एकेकाळी अख्खी कंपनीच विकायला निघालेले रतन टाटा; आज एवढी नफ्यात की...

वर्षभरात केले मालामाल
टाटा स्टीलच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूक दारांना मालामाल केले आहे. गेल्या वर्षी 23 सप्टेंबरला 361 रुपयांवर असलेल्या या शेअरने वर्षभरात मोठी झेप घेतली आहे. जवळपास चौपट उसळी मारत गुंतवणूकदारांना देखील मोठी कमाई करून दिली आहे. 

Web Title: Tata steel share drops in last 5 days; investor's making 4 times money in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app