Lokmat Money > बिझनेस न्यूज > तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश

तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश

Tamil Nadu Economy : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आर्थिक सल्लागार परिषद. नोबेल विजेते डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांचा समावेश.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:33 PM2021-06-21T15:33:42+5:302021-06-21T15:35:18+5:30

Tamil Nadu Economy : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आर्थिक सल्लागार परिषद. नोबेल विजेते डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांचा समावेश.

Tamil Nadu to form economic advisory council to CM with Esther Duflo Raghuram Rajan as member | तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश

तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणार Dr. Raghuram Rajan; नोबेल विजेत्यांसह अनेकांचा परिषदेत समावेश

Highlights तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आर्थिक सल्लागार परिषद. नोबेल विजेते डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांचा समावेश.

Tamil Nadu Economy : तामिळनाडूच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जगभरात परिचयाच्या असलेल्या अर्थतज्ज्ञांची एक आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्याचा निर्णय तामिळनाडू राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली. या आर्थिक सल्लागार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी प्रमुख अर्थतज्ज्ञांचा समावेश केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर (Reserve Bank of India) डॉ. रघुराम राजन (Dr, Raghuram Rajan), नोबेल विजेते इस्थर डुफलो, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन, अर्थतज्ज्ञ ज्यां द्रेज आणि माजी केंद्र अर्थ सचिव एस. नारायण यांचा समावेश करण्यात आला आहे.

"या परिषदेच्या सूचनांनुसार राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित केली जाईल. तसंच समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आर्थिक विकासाचा लाभ पोहोचवला जाईल. या विकासामुळे आर्थिक धोरणात परिवर्तन येण्याची शक्यता आहे. यामुळे तंत्रज्ञान अपग्रेडच्या माध्यमातून जिल्हास्तरीय विविध उद्योगांनाही प्रोत्साहन मिळेल," असं पुरोहित म्हणाले. "मध्यम आणि छोट्या उद्योगांना पुनरुज्जीवित करम्यासाठी उद्योजक, बँकिंग, अर्थिक तज्ज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांची एक एक्सपर्ट समिती स्थापन केली जाईल, जी या क्षेत्रात नव्या योजना घेऊन येईल," असंही त्यांनी नमूद केलं. 


"आर्थिक सल्लागार परिषदेत आणि अन्य समिती राज्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करेल. याशिवाय ते राज्याच्या जनतेच्या हिताची धोरणं ठवण्यासाठी सल्लाही देईल. याचा फायदा समजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल," असं पुरोहित म्हणाले.

Web Title: Tamil Nadu to form economic advisory council to CM with Esther Duflo Raghuram Rajan as member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.