Yajur Fibres IPO: पुढच्या आठवड्यात यजुर फाइबर्सचा (Yajur Fibres) आयपीओ उघडत आहे. हा एसएमई (SME) सेगमेंटमधील आयपीओ असेल. कंपनीच्या आयपीओचा आकार १२०.४१ कोटी रुपये आहे. हा इश्यू पूर्णपणे नवीन शेअर्सवर आधारित आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ६९ लाख नवीन शेअर्स जारी करेल. हा आयपीओ ७ जानेवारी ते ९ जानेवारी या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला राहील.
Yajur Fibres IPO प्राईस बँड काय आहे?
या आयपीओचा प्राईस बँड १६४ रुपये ते १७४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीकडून ८०० शेअर्सचा एक प्राईस बँड ठरवण्यात आला आहे. परंतु किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १६०० शेअर्स खरेदी करावे लागतील. यामुळे गुंतवणूकदारांना किमान २,७८,४०० रुपयांची बोली लावावी लागेल. या आयपीओचं लिस्टिंग बीएसई एसएमईमध्ये (BSE SME) होईल.
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
मार्केटमध्ये आयपीओ 'शून्य' रुपयांवर
कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब म्हणजे ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ संघर्ष करत आहे. सध्याच्या काळात कंपनीचा आयपीओ शून्य रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहे. 'इन्व्हेस्टर्स गेन'च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. सध्याचा जीएमपी (GMP) प्रीमियम लिस्टिंगची शक्यता नाकारतो.
कंपनी काय करते?
या कंपनीची सुरुवात १९८० मध्ये झाली. कंपनी फ्लॅक्स, ज्यूट आणि हेम्पवर प्रक्रिया आणि मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे काम करते. सध्याच्या काळात ३०० मेट्रिक टन उत्पादन करण्याची तिची क्षमता आहे. कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंगालमध्ये स्थित आहे.
आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी बंगालमधील मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये शेड बांधण्यासाठी करेल. तसंच आपल्या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करेल. आयपीओच्या पैशांचा वापर वर्किंग कॅपिटल आणि सामान्य कॉर्पोरेट कार्यांसाठीदेखील केला जाईल. दरम्यान, होरिझोन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडची बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर MAS सर्व्हिसेसची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
