Share Market Crisis: "रिच डॅड पुअर डॅड"चे (Rich Dad Poor Dad) लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी नुकताच दावा केला आहे की, अमेरिका, युरोप आणि आशियातील बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांनी आपली मालमत्ता लवकरात लवकर सुरक्षित आणि दुर्मिळ वस्तूंमध्ये, जसं की गोल्ड, सिल्वर, बिटकॉइन आणि एथेरियममध्ये रूपांतरित करावी, असं त्यांचं म्हणणं आहे. या मंदीचं मुख्य कारण सध्याचं आर्थिक संकट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) नोकऱ्यांमध्ये होणारे बदल हे आहेत.
मंदीचे मुख्य कारण काय?
कियोसाकी यांच्या मते, ही मंदी सामान्य आर्थिक चक्र किंवा गुंतवणूकदारांच्या भावनांचा परिणाम नाही. यामागे खोलवर गेलेली संरचनात्मक कारणं आहेत, विशेषत: वेगानं बदलणारं तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
प्रॉपर्टीचे दरही कोसळणार
एआयमुळे नोकऱ्या संपुष्टात येतील, त्यानंतर रिअल इस्टेटमधील ऑफिस आणि निवासी दोन्ही मालमत्ता घसरणीच्या टप्प्यात येतील, असं ते म्हणतात. जेव्हा नोकरीच राहणार नाही, तेव्हा प्रॉपर्टीचे दरही धराशायी होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गोल्ड, सिल्वर, बिटकॉइन आणि एथेरियम सुरक्षित पर्याय
या संकटाच्या काळात, कियोसाकी गुंतवणूकदारांना सोनं, चांदी, बिटकॉइन आणि एथेरियम सारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला देतात. त्यांचं म्हणणं आहे की, "चांदी सर्वात चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे." त्यांनी चांदीसाठी भाकीत केलं की, आज याची किंमत ५० डॉलर आहे आणि लवकरच ती ७० डॉलर पर्यंत जाऊ शकते. २०२६ पर्यंत २०० डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जरी त्यांना बाजारातील घसरणीची चिंता असली, तरी ते असंही मानतात की, जे तयार आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एक मोठी संधी बनू शकतो. योग्य पद्धतीनं योजना आखल्यास याच घसरणीतून समृद्ध होता येऊ शकते.
मागील भाकितं किती खरी ठरली?
कियोसाकी यांनी यापूर्वीही बाजारात मोठ्या घसरणीची शक्यता वर्तवली आहे. ९ नोव्हेंबर रोजी त्यांनी गोल्डची किंमत २७,००० डॉलर आणि बिटकॉइनची किंमत २५०,००० डॉलर (२०२६ पर्यंत) पर्यंत पोहोचेल असं भाकीत केलं होतं. ते नेहमी पैशाचे नियम, जसे की ‘ग्रेशम’ आणि ‘मेटकाल्फ’ लॉ चा संदर्भ देतात आणि या तर्कासह गोल्ड, सिल्वर, बिटकॉइन आणि एथेरियम खरेदीवर जोर देतात. त्यांच्या मते, हे संकट तीच 'संक्रमणाची' वेळ आहे, ज्यात सर्वात जास्त बदल आणि मालमत्तेचं हस्तांतरण होईल आणि जे जागरूक आहेत, ते यातून सर्वात जास्त लाभ घेऊ शकतात.
