Lokmat Money >शेअर बाजार > तोटा होऊनही झोमॅटो ब्लिंकिटमध्ये का ओतताहेत पैसा? कंपनीच्या मनात नेमकं काय?

तोटा होऊनही झोमॅटो ब्लिंकिटमध्ये का ओतताहेत पैसा? कंपनीच्या मनात नेमकं काय?

blinkit : तिमाही निकालात क्लिंकिटचा तोटा ८ कोटींवरुन १०३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत झोमॅटो ब्लिंकिटमध्ये पैसा लावत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:23 IST2025-01-29T12:22:51+5:302025-01-29T12:23:12+5:30

blinkit : तिमाही निकालात क्लिंकिटचा तोटा ८ कोटींवरुन १०३ कोटींपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत झोमॅटो ब्लिंकिटमध्ये पैसा लावत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Why zomato is investing money in blinkit what is the strategy behind this | तोटा होऊनही झोमॅटो ब्लिंकिटमध्ये का ओतताहेत पैसा? कंपनीच्या मनात नेमकं काय?

तोटा होऊनही झोमॅटो ब्लिंकिटमध्ये का ओतताहेत पैसा? कंपनीच्या मनात नेमकं काय?

zomato is investing money in blinkit : देशात क्विक कॉमर्स क्षेत्राने क्रांती आणली आहे. म्हणजे तुम्ही मोबाईवरुन ऑर्डर केलेली वस्तू घराबाहेर येईपर्यंत दरवाजावर आलेली असते. यामध्ये आता अ‍ॅमेझॉन सारखे मोठे ब्रँड उतरण्याची तयारी करत आहेत. दुसरीकडे या स्पर्धेतील मोठा खेळाडू असलेल्या झोमॅटो कंपनीची उपकंपनी ब्लिंकिटचा नफा कमी झाला आहे. तिमाही निकालानुसार नफ्यात ६६ टक्के घट झाली आहे. त्यानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. असं असूनही कंपनी तिच्या भागीदार क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. झोमॅटो हे का करत आहे, यामागे काही खास रणनीती आहे का ते समजून घेऊया?

झोमॅटोचा ब्लिंकिटवर मोठा डाव
क्विक कॉमर्स क्षेत्राची वाढ पाहता झोमॅटो ब्लिंकिटच्या विस्तारावर डाव लावत आहे. झोमॅटोने मार्च २०२५ पर्यंत त्यांच्या स्टोअरची संख्या सध्याच्या ५२६ वरून १,००० पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. झोमॅटोची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू वार्षिक आधारावर १२० टक्के आणि तिमाही आधारावर २७ टक्क्यांनी वाढली. ब्लिंकिटच्या आक्रमक विस्तारामुळे आणि बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीचा तोटा ८ कोटींवरुन १०३ कोटींवर गेला आहे.

झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण
गुंतवणूकदारांमधील संभ्रमामुळे, गेल्या महिन्यात झोमॅटोचे शेअर्स २३ टक्क्यांनी घसरले. गेल्या ५ दिवसांचं पाहिलं तर ही घसरण ७ टक्के इतकी आहे. तर निफ्टी ५० निर्देशांकात केवळ २.3 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

ब्लिंकिटला घेऊन कंपनीची योजना काय आहे?
कंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी ब्लिंकिटच्या विस्ताराबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे. “आम्ही क्विक कॉमर्ससाठी आधीच मोठी गुंतवणूक केली आहे, जी आम्हाला पुढील काही तिमाहींमध्ये करायची होती. आता आमचे लक्ष्य डिसेंबर २०२५ पर्यंत २,००० डार्क स्टोअर्सचे आहे, जे आधी डिसेंबर २०२६ पर्यंत होते.”

ब्लिंकटला मोठ्या स्पर्धेला सामारे जावे लागणार 
झोमॅटोची ही दीर्घकालीन रणनीती भारतीय बाजारपेठेत यश मिळवू शकते, असे बाजारातील तज्ञांचे मत आहे. परंतु, नजीकच्या भविष्यात अनेक आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल. कंपनीला ब्लिंकिटचे मॉडेल नफ्यात बदलणे आणि गुंतवणूक संतुलित करणे आवश्यक आहे. कारण, बाजारात आता मोठमोठे स्पर्धक उतरण्याची तयारी करत आहे.

Web Title: Why zomato is investing money in blinkit what is the strategy behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.