Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले

युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले

Crude Stocks : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११५ डॉलर्सच्या वर गेल्यानंतर आज, ९ मार्च रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:12 IST2026-03-09T13:09:14+5:302026-03-09T13:12:07+5:30

Crude Stocks : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११५ डॉलर्सच्या वर गेल्यानंतर आज, ९ मार्च रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.

Why Indigo, Asian Paints, and JK Tyre Fell Today: Impact of Rising Oil Prices on Indian Stocks | युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले

युद्धाच्या आगीत बाजार होरपळला! एअरलाईन्स-पेंट्स शेअर्स धडाम; झटक्यात १० लाख कोटी बुडाले

Crude Stocks : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी ११५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात भूकंपसदृश स्थिती पाहायला मिळाली. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्याने इंधन पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स २४०० हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीने २३,८०० ची महत्त्वाची पातळी तोडली.

एअरलाईन्स आणि पेंट्स शेअर्सना 'लोअर सर्किट'चा धोका
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा सर्वाधिक फटका तेल उत्पादनांवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना बसला आहे.

  • विमान सेवा: एटीएफ महागण्याच्या भीतीने इंडिगो ७ टक्क्यांनी तर स्पाइसजेट ६ टक्क्यांनी घसरले.
  • पेंट उद्योग: रंगांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पेट्रोकेमिकलवर आधारित असतो. यामुळे एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स आणि कन्साई नेरोलॅक यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत कोसळले.
  • टायर कंपन्या: जेके टायर आणि अपोलो टायर्सच्या शेअर्समध्ये ६.५ टक्क्यांपर्यंत मोठी पडझड झाली.

बाजारातील मोठी पडझड
सेन्सेक्स: २४०१ अंकांच्या घसरणीसह ७६,५१७ वर (३.०४% घसरण)
निफ्टी: ७२७ अंकांच्या घसरणीसह २३,७२३ वर (२.९७% घसरण)

वाचा - टेक महिंद्रात कोणतीही कर्मचारी कपात नाही; सोशल मीडियावरील पोस्ट्सवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

का पेटला तेलाचा बाजार?
पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद झाल्याने 'होर्मुजच्या सामुद्रधुनीतून' होणारा तेल पुरवठा धोक्यात आला आहे. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी २०% वाहतूक याच मार्गाने होते. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य रणनीतीकार व्ही.के. विजयकुमार यांच्या मते, "ब्रेंट क्रूडचे दर ११५ डॉलरच्या पार जाणे हा भारतासारख्या तेल आयातदार देशासाठी मोठा 'मॅक्रो' धक्का आहे. यामुळे महागाई वाढून व्याजाचे दर आणि आर्थिक विकासाचा वेग मंदावू शकतो."
 

Web Title : युद्ध के डर से बाजार में हाहाकार: एयरलाइंस, पेंट में गिरावट; 10 लाख करोड़ डूबे

Web Summary : भू-राजनीतिक तनाव से भारतीय बाजार में गिरावट, कच्चे तेल की कीमतें बढ़ीं। लागत बढ़ने से एयरलाइन और पेंट स्टॉक दुर्घटनाग्रस्त हो गए। वैश्विक अनिश्चितता के बीच निवेशकों को भारी नुकसान।

Web Title : War Fears Roil Markets: Airlines, Paints Plunge; $120B Wiped Out

Web Summary : Geopolitical tensions sent Indian markets reeling, with crude oil prices spiking. Airline and paint stocks crashed due to rising costs. Investors lost billions as indices plummeted amidst global uncertainty.