Lokmat Money >शेअर बाजार > बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

Anil Ambani Rs 3000Cr Target : अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्राने २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ३००० कोटी रुपये कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचा परिणाम सोमवारी आरआयएल इन्फ्रा शेअरमध्ये झालेल्या जोरदार वाढीच्या स्वरूपात दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:12 IST2025-06-02T13:11:31+5:302025-06-02T13:12:04+5:30

Anil Ambani Rs 3000Cr Target : अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्राने २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ३००० कोटी रुपये कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचा परिणाम सोमवारी आरआयएल इन्फ्रा शेअरमध्ये झालेल्या जोरदार वाढीच्या स्वरूपात दिसून आला.

Why Anil Ambani's Reliance Infra, Power Shares Are Surging Today | बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

Anil Ambani Rs 3000Cr Target : एकेकाळी कर्जबाजारी झालेले उद्योगपती अनिल अंबानी जोरदार पुनरागमन करताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या बहुतेक कंपन्या कर्जमुक्त झाल्या असून कामगिरीत चांगली सुधारणा झाली आहे. ताजं उदाहरण द्यायचं झालं तर आज सोमवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहे. अशा परिस्थितीत अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्सची घोडदौड पाहायला मिळत आहे. त्यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये सुमारे ४% वाढ झाली, तर रिलायन्स पॉवरनेही जोरदार मुसंडी मारली.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये विक्रमी वाढ
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपमधील आघाडीची कंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (RIL Infra) शेअर्समध्ये सोमवारी जोरदार वाढ दिसून आली. हा शेअर मागील बंदच्या तुलनेत ३३२ रुपयांवर उघडला आणि लवकरच तो ३४४ रुपयांवर व्यवहार करताना दिसला. या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅपही १३,५५० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे, अनिल अंबानींचा हा शेअर आता आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या (३५१ रुपये) अगदी जवळ पोहोचला आहे. तत्पूर्वी, गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शुक्रवारी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर ५.६७% वाढून ३३०.८० रुपयांवर बंद झाला होता.

शेअरच्या वाढीमागे 'हे' आहे कारण!
रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे कंपनीने ठेवलेले महत्त्वाकांक्षी उत्पन्न लक्ष्य हे प्रमुख कारण मानले जात आहे. अनिल अंबानी आता आपला व्यवसाय संरक्षण (Defence) क्षेत्रात वेगाने वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. रिलायन्स इन्फ्राने आर्थिक वर्ष २०२७ च्या अखेरीस १५५ मिमी दारूगोळ्याच्या निर्यातीतून ३,००० कोटी रुपये कमावण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. कंपनी चालू वर्षात १,५०० कोटी रुपयांचे मोठ्या कॅलिबरचे दारूगोळे निर्यात करेल अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, कंपनीचे भारतातील टॉप-३ संरक्षण उपकरणे निर्यातदारांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

डिफेन्स सिटीमध्ये ५००० कोटींची गुंतवणूक!
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रवक्त्याने पीटीआयला (PTI) दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानींच्या कंपनीसाठी दारूगोळा निर्यात हे एक प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी विकसित करत आहेत, ज्यात ५,००० कोटी रुपये गुंतवणुकीचे काम सुरू आहे. डीएडीसी वाटड औद्योगिक क्षेत्रात १,००० एकरवर पसरलेला असेल आणि भारतीय संरक्षण क्षेत्रातील खाजगी संस्थेने हाती घेतलेला हा सर्वात मोठा 'ग्रीनफील्ड' (नवीन प्रकल्प) प्रकल्प असणार आहे.

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्येही मोठी वाढ!
सोमवारी घसरत्या बाजारात केवळ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सच नाही, तर अनिल अंबानींचा पॉवर स्टॉक रिलायन्स पॉवर देखील वादळी वाढीसह व्यवहार करत आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर ५८.६४ रुपयांवर उघडला आणि काही मिनिटांतच तो ५.५० टक्क्यांनी वाढून ६१.४० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅपही २५,२२० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

वाचा - दशकपूर्वीची एक चूक जपानला महागात! भारताने टाकले मागे, जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी 'धोक्याची घंटा'!

(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी, कृपया तुमच्या बाजारातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Why Anil Ambani's Reliance Infra, Power Shares Are Surging Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.