Share Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात मंदीचे सावट पाहायला मिळाले. बुधवारी (७ जानेवारी) प्रचंड चढ-उतारांनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल निशाणीत बंद झाले. जागतिक भू-राजकीय तणाव आणि परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री यामुळे बाजाराचा मूड खराब राहिला. मात्र, सेन्सेक्स कोसळलेला असतानाही 'ब्रॉडर मार्केट'मधील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज २५,००० कोटी रुपयांची भर पडली आहे.
बाजाराची आजची आकडेवारी
- बीएसई सेन्सेक्स : १०२.२० अंकांनी घसरून ८४,९६१.१४ वर बंद.
- निफ्टी ५० : ३७.९५ अंकांनी घसरून २६,१४०.७५ वर स्थिरावला.
- गुंतवणूकदारांचा फायदा : बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ४७९.६० लाख कोटींवरून ४७९.८५ लाख कोटींवर पोहोचले.
क्षेत्रीय कामगिरी
आजच्या सत्रात आयटी, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. आयटी इंडेक्समध्ये १.८ टक्क्यांपर्यंत तेजी होती. दुसरीकडे, ऑईल अँड गॅस, रियल्टी आणि टेलिकॉम निर्देशांक ०.५ टक्क्यांपर्यंत घसरले. विशेष म्हणजे, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सकारात्मक हालचाल पाहायला मिळाली.
टॉप ५ गेनर्स (सेंसेक्स):
- टायटन : +२.८७%
- एचसीएल टेक : +१.७५%
- टेक महिंद्रा : +१.६०%
- इन्फोसिस : +१.५०%
- सन फार्मा : +१.२८%
टॉप ५ लूझर्स (सेंसेक्स):
- मारुती सुझुकी : -८.६२% (सर्वात मोठी घसरण)
- पॉवर ग्रिड : -४.४२%
- एचडीएफसी बँक : -३.५०%
- एशियन पेंट्स : -२.१५%
- टाटा स्टील : -१.८१%
व्यवहारांची स्थिती
आज बीएसईवर एकूण ४,३५० शेअर्समध्ये व्यवहार झाले. बाजारात विक्रीचा दबाव असूनही २,१०८ शेअर्स वधारले, तर २,०६६ शेअर्समध्ये घसरण झाली. १७६ शेअर्स स्थिर राहिले. व्यवहार दरम्यान १४० शेअर्सनी आपला ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १२१ शेअर्सनी नीचांकी स्तर गाठला.
