Titagarh Rail Systems Share Price: रेल्वे क्षेत्रातील कंपनी टीटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडला मुंबईमेट्रो लाईनकडून अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले आहेत. कंपनीला एकूण २४८१ कोटी रुपयांचं काम मिळालंय. यासंबंधीची माहिती टीटागढने शुक्रवारी एक्सचेंजसोबत शेअर केली. मुंबईमेट्रो लाईन ५ प्रोजेक्ट अंतर्गत हे काम मिळालं आहे. या वर्क ऑर्डरनुसार टीटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडला डिझाइन, मॅन्युफॅक्चर, सप्लाय, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगचे काम मिळाल्याचं कंपनीनं सांगितलं.
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
काय करणार कंपनी?
कंपनीनं सांगितलं आहे की, २४८१ कोटी रुपयांची ही ऑर्डर दोन्ही टप्प्यांचा समावेश करेल. पहिला टप्पा कापूर ते धामणकर नाका पर्यंत आणि दुसरा टप्पा धामणकर नाका ते कल्याण एपीएमसीपर्यंत आहे. या वर्क ऑर्डरमध्ये कंपनीला ट्रेन कंट्रोल सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन्स, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स, रोलिंग स्टॉक इत्यादी पुरवायचे आहे. याव्यतिरिक्त, कंपनीला दोन वर्षांसाठी मेंटेनन्सचेही काम करायचं आहे. कॉन्ट्रॅक्टनुसार, पहिला टप्पा १०८ आठवड्यांत सुरू होईल.
शेअर बाजारात काय आहे स्थिती?
शुक्रवारी टीटागढचे शेअर्स १.५० टक्क्यांच्या घसरणीसह ८८६ रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. मागील एका वर्षात पोझिशनल गुंतवणूकदारांना २७ टक्क्यांचे नुकसान झालं आहे. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की ६ महिन्यांत टीटागढ रेल सिस्टम्सच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांची तेजी आली आहे.
२ वर्षांत देखील हा रेल्वे स्टॉक इंडेक्सच्या तुलनेत चांगला परतावा देऊ शकलेला नाही. २ वर्षांत कंपनीच्या शेअर्सचा भाव १६.१९ टक्के वाढला आहे. तर, सेन्सेक्स इंडेक्समध्ये ३१ टक्क्यांची तेजी आली. ५ वर्षांत टीटागढनं गुंतवणूकदारांना २०६५ टक्के परतावा दिलाय.
सातत्यानं दिलाय डिविडेंड
टीटागढ अशा कंपन्यांपैकी एक आहे जी गुंतवणूकदारांना सतत डिविडेंड देत आहे. कंपनीचे शेअर्स शेवटचे याच वर्षी सप्टेंबर महिन्यात एक्स-डिविडेंड ट्रेड झाले होते. तेव्हा पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक रुपयाचा डिव्हिडंड मिळाला होता. माहितीनुसार, २०२४ मध्येही कंपनीने एका शेअरवर ०.८० रुपयांचा डिविडेंड गुंतवणूकदारांना दिला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
