Lokmat Money >शेअर बाजार > शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

Top Performing Small-Cap Stocks : गेल्या आठवड्यात, पाच शेअर्सनी केवळ ५ दिवसांत ५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. मात्र, हे शेअर्स खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:37 IST2025-09-21T16:36:51+5:302025-09-21T16:37:52+5:30

Top Performing Small-Cap Stocks : गेल्या आठवड्यात, पाच शेअर्सनी केवळ ५ दिवसांत ५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. मात्र, हे शेअर्स खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

These 5 Stocks Gave Up to 55% Return in Just One Week | शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

Top Performing Small-Cap Stocks : शेअर मार्केटमध्ये पाण्यासारखा पैसा वाहतो, असं म्हटलं जातं. फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करता यायला हवी. मायक्रो आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स अनेकदा गुंतवणूकदारांना जास्त परतावा देतात, पण त्यात जोखीमही जास्त असते. या कंपन्यांचे शेअर्स अत्यंत अस्थिर असल्यामुळे यात खूप विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. मात्र, जर योग्य शेअर निवडला तर तो तुम्हाला खूप कमी वेळेत मालामाल बनवू शकतो.

गेल्या आठवड्यात ५ स्मॉल कॅप शेअर्सनी फक्त ५ कामकाजाच्या दिवसांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल ५५ टक्क्यांपर्यंतचा भरघोस परतावा दिला. या शेअर्सची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

सर्वाधिक परतावा देणारे शेअर्स
१. एम्पावर इंडिया शेअर

गेल्या आठवड्यात एम्पावर इंडियाचा शेअर १.२८ रुपयांवरून १.९८ रुपयांवर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांना ५४.६९% परतावा मिळाला. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल २३०.४३ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी हा शेअर २०% अप्पर सर्किटमध्ये बंद झाला.

२. ग्रीनहाईटेक व्हेंचर्स शेअर
ग्रीनहाईटेक व्हेंचर्सचा शेअर ८५ रुपयांवरून १२४.७१ रुपयांवर पोहोचला. यामुळे एकाच आठवड्यात या शेअरने ४६.७२% परतावा दिला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल १६२ कोटी रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर ५% अप्पर सर्किटमध्ये बंद झाला.

३. न्यूटाईम इन्फ्रास्ट्रक्चर शेअर
न्यूटाईम इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने आठवड्याभरात २.७४ रुपयांवरून ३.९३ रुपयांपर्यंत मजल मारली. या शेअरने ४३.४३% ची वाढ नोंदवली. कंपनीचे बाजार भांडवल २०६.२६ कोटी रुपये आहे. मात्र, शुक्रवारी या शेअरमध्ये ४.८४% ची घसरण झाली.

४. इंटेंस टेक्नोलॉजीज शेअर
इंटेंस टेक्नोलॉजीजचा शेअर ८८.७४ रुपयांवरून १२६.८४ रुपयांवर पोहोचला. या शेअरने सुमारे ४३% परतावा दिला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल २९३.८९ कोटी रुपये आहे.

५. कॅस्पियन कॉर्पोरेट सर्विसेस शेअर
कॅस्पियन कॉर्पोरेट सर्विसेसचा शेअर ७.१२ रुपयांवरून १०.०४ रुपयांवर पोहोचला. या शेअरने गुंतवणूकदारांना ४१.०१% परतावा दिला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल १२७.११ कोटी रुपये आहे. मात्र, या शेअरमध्ये शुक्रवारी १०% लोअर सर्किट लागला होता.

वाचा - २२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

महत्त्वाची सूचना: शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. वर उल्लेख केलेल्या शेअर्सनी भरघोस परतावा दिला असला तरी, त्यांच्यातील अस्थिरता आणि जोखीम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.

Web Title: These 5 Stocks Gave Up to 55% Return in Just One Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.